VIDEO : बिबट्याने बुद्धीचा वापर केला म्हणून बचावला, पाहा व्हिडीओ

| Updated on: Sep 01, 2023 | 2:47 PM

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये बिबट्याने बुद्धीचा चांगला वापर केल्यामुळे तो बचावला असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

VIDEO : बिबट्याने बुद्धीचा वापर केला म्हणून बचावला, पाहा व्हिडीओ
LION ATTACK
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : सिंहाच्या (lion video) तावडीत एखादा सापडला, तर त्याची सुटका होणं किती अवघड असतं हे आपण अनेकदा व्हिडीओच्या माध्यमातून पाहिलं आहे. सिंहाचा हल्ला अधिक खतरनाक असतो. सिंह हा पूर्ण ताकदीनिशी हल्ला करतो. सिंहाच्यासमोर अनेक प्राणी थांबत सुध्दा नाहीत. मग तो मनुष्य असला तरी तिथून पळ काढतो. हा माणसासा सिंह काही सेंकदात फाडू शकतो. काहीवेळेला आपल्याला एखादं डेंजर जनावर जरी दिसलं, तरी आपण तिथून पळ काढतो. सध्या सोशल मीडियावर (social media) असाचं एक व्हिडीओ व्हायरल (leopard video) झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसू शकतो.

एक बिबट्या जंगलात भटकत आहे. त्याचवेळी अचानक एका सिहाने त्याच्यावर हल्ला केला. ज्यावेळी बिबट्याला पाठीमागे सिंह लागल्यालं समजतं, त्यावेळी तो आपला जीव वाचवून इकडे तिकडे धावू लागतो. ज्यावेळी तो सिंह त्याच्याजवळ गेला आहे, त्यावेळी बिबट्याने बुद्धीचा वापर केला तो म्हणून बचावला आहे. परंतु त्याचवेळी सिंह त्या बिबट्याची शिकार करायची म्हणून खाली वाट पाहत बसला आहे. नंतर सिंहाने बिबट्याची शिकार सुध्दा केली असेल, परंतु व्हिडीओत पुढच्या गोष्टी दिसत नाहीत.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, एक सिंह कशा पद्धतीने बिबट्याची शिकार करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु त्याचवेळी त्या बिबट्याने आपल्या बुध्दीचा वापर केला आणि झाडाचा सहारा घेतला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर infavoritewild या नावाच्या खात्यावरुन शेअर केला आहे. त्य़ाचबरोबर कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ‘बिबट्या नामशेष होण्याच्या मार्गावर असण्याचे एक कारण म्हणजे सिंहासारखे इतर शक्तिशाली शिकार करीत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत 23 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर शेकडो लोकांनी हा व्हिडीओ व्हायरल सुध्दा केला आहे. या व्हिडीओला विविध प्रकारच्या कमेंट सुध्दा आल्या आहेत.