सोशल मीडियावर स्टंटचे अनेक धोकादायक व्हिडीओ समोर येत असतात. लोक कधी बाईकवर, सायकलवर बसून तर कधी गाडीच्या वर बसून स्टंट करत असतात. नुकताच एक अतिशय धोकादायक स्टंट समोर आला जेव्हा एक मुलगा वेगाने बाईक चालवत होता. मग अचानक तो खाली पडला. आश्चर्याची बाब म्हणजे या बाईकला एकच चाक होते.
हा व्हिडिओ एका युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, भावाने असा धोकादायक स्टंट करायला नको होता. व्हिडिओमध्ये एक मुलगा रस्त्यावर दुचाकी घेऊन स्टंट करताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या बाईकला एकच चाक आहे. तरीही तो त्याला वेगाने चालवतोय.
बाईकचे पुढचे चाक तुटले असून मागील चाकाच्या बॅलन्सवर बाईक वेगाने धावत आहे. तो बाईकचं एक्सेलेरेटर वाढवतच जातो, बाईकचा वेग वाढतच जातो. पण नंतर त्याचा तोल जातो आणि दुचाकी पुढे कोसळते. व्हिडिओच्या शेवटी दिसत आहे की, मुलगा अतिशय भयंकर पद्धतीने तोंडावर पडतो.
इतना रिस्की स्टंट भी नहीं करना था…#Trending #TrendingNow #viral pic.twitter.com/6NOJfbvBXH
— Narendra Singh (@NarendraNeer007) January 19, 2023
हा व्हिडिओ व्हायरल झाला असून आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे हा व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्तीही दुचाकीवर बसलेला दिसतो आणि तो पुढे-मागे रेकॉर्डिंग करत असतो. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.