मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हे एक प्रकारचे कोडे असते. आपण लहानपणी कोडी सोडवायचो, सगळी भावंडं एकत्र आली की आपण एकेमकांना कोडी घालायचो. ज्याला कोडं सोडवता येईल तो हुशार. आपण पण मग खूप मन लावून कोडे सोडवायचा प्रयत्न करायचो, उत्तर आलो की आपण सगळ्यांमध्ये स्टार व्हायचो. पूर्वी म्हणजे काही वर्षांपूर्वी ही कोडी तोंडी घातली घ्यायची, तोंडी सोडवली जायची. आता ही कोडी ऑनलाइन असतात ज्याला आपण ऑप्टिकल भ्रम असं म्हणतो. ऑप्टिकल भ्रम माणसाला गोंधळून टाकतात. या चित्रांमध्ये जे दिसतं ते तसंच असतं असं नाही म्हणूनच या चित्रांना भ्रम म्हणतात.
आता हे चित्र बघा. या चित्रात तुम्हाला लाल रंगाची वर्तुळे दिसतील. या वर्तुळात तुम्हाला वेगळ्या रंगाचे वर्तुळे शोधायची आहेत. आधी हे चित्र पाहिल्यावर तुम्हाला सगळेच वर्तुळे एका रंगाची म्हणजे लाल दिसतील. तुम्हाला वाटेल की यात वेगळं असं काहीच नाहीये. पण लक्षात ठेवा की हा भ्रम आहे. हे चित्र नीट निरखून बघा, यात सगळ्या वर्तुळांकडे नीट बघा. एक तरी वर्तुळ वेगळा दिसला का?
आम्ही तुम्हाला याचं उत्तर देतो. यात लाल रंगाचे वर्तुळ आहेत जे सगळ्यांनाच दिसून येतील. पण लाला रंगांच्या वर्तुळासोबतच इथे गडद लाल रंगाचे वर्तुळ सुद्धा आहेत. होय. आता तुम्हाला हेच गडद रंगाचे वर्तुळ शोधायचे आहेत. दिसले का? एका एका लाईन मधून नजर फिरवा तुम्हाला गडद रंगाचे वर्तुळे दिसतील. एक नाही एकापेक्षा जास्त ही वर्तुळे आहेत. तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर तुमचं निरीक्षण कौशल्य चांगलं आहे. जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं नसेल तर आम्ही खाली उत्तर देत आहोत.