जर तुम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असाल तर कधी ना कधी तुम्हाला ऑप्टिकल इल्युजनचा सामना करावा लागला असेल. खरं तर अशी चित्रं म्हणजे एक कोडं असतं, जे लोकांना गोंधळून टाकतं. मात्र, त्यानंतरही नेटकऱ्यांना ते सोडवण्यात मजा येते. हल्ली एक चित्र म्हणजेच ऑप्टिकल इल्युजन चर्चेचा विषय बनला आहे, ज्यामुळे लोकं प्रचंड हादरली आहेत. सर्वात मोठा तुर्रम खानसुद्धा याचं उत्तर शोधू शकत नाही. ऑप्टिकल भ्रमांचे अनेक प्रकार आहेत. हे रेखाचित्रे, चित्रे, छायाचित्रे किंवा अनेक रंगांचे मिश्रण असू शकतात. ते सहज किंवा हुशारीने डिझाइन करणारे कलाकार काही गोष्टी लपवतात. त्याचबरोबर या लपलेल्या गोष्टी शोधण्याचे काम लोकांना दिले जाते.
आता व्हायरल होत असलेला हा फोटो बघा. हिरव्या रंगाचे हे चित्र तुम्हाला एकदम नॉर्मल दिसेल. पण ग्रीन पॅटर्नमध्ये दोन अंक दडलेले आहेत. होय, तुम्ही बरोबर वाचलेत.
आता 15 सेकंदात हे दोन आकडे कोणते आहेत हे सांगावे लागेल. पण हे आकडे शोधण्यासाठी आपल्याला प्रचंड डोकं लावावं लागणारे.
या फोटोमुळे केवळ 1 टक्के जनतेला हे कोडं सोडवण्यात यश आल्याचा दावा करण्यात आला आहे. उरलेले ९९ टक्के लोक चित्रातील भ्रमात अडकलेले आहेत.
ज्यांनी अद्याप आकडे पाहिलेले नाहीत, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. आम्ही आपल्यासाठी खाली प्रतिचित्र देखील सामायिक करीत आहोत. चित्रातील दोन अंक 3 आणि 0 आहेत, जे आपल्या डोळ्यांसमोर आहेत.