मुंबई: आपण कधी विचार केला आहे का की प्रश्न पाहिल्या पहिल्याच एक मेंदू गोंधळतो. खरं तर हा एक मानसशास्त्रीय भाग आहे आणि तो लोकांच्या निरीक्षण कौशल्याचे मूल्यमापन करतो. आपला मेंदू किती वेगाने विचार करू शकतो याचा एक अंदाज घेण्यासाठी आपण रोज एकतरी ऑप्टिकल इल्युजन सोडवायला हवं. हे एक प्रकारचं कोडंच असतं. कोडं कमीतकमी वेळेत सोडविण्यास कोण सक्षम आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनबाबत अनेक प्रकारचे फोटो व्हायरल होत आहेत. एका चित्राने लोकांना पार गोंधळून टाकले आहे.
संख्या आधारित ऑप्टिकल भ्रम अगदी सोपे आहेत. एक गोंधळात टाकणारा ऑप्टिकल भ्रम व्हायरल झाला आहे. प्रेक्षकांना यात चित्रात लपलेले सर्व आकडे शोधण्याचे आव्हान आहे. हा भ्रम सध्या व्हायरल होतोय. या चित्रात एकमेकांच्या वर लपलेले अनेक आकडे आहेत. चित्रात १० वेगवेगळे आकडे शोधायचे आहेत. फक्त 0.1% वापरकर्ते सर्व 10 अंक पाहू शकतात, असा दावा त्यांनी केला.
प्रथमदर्शनी 684 सारखे दोन-तीनच आकडे दिसतात, पण अधिक बारकाईने पाहिलं तर काहींना ‘1’ तर अनेकांना ‘4’ हा आकडाही दिसेल. सर्व आकडे शोधण्यासाठी प्रेक्षकांना एक-दोन युक्त्या लावाव्या लागतात. एका युजरने लिहिले की, मी 684 पाहू शकतो पण मला अजूनही 1 4 सापडत नाहीत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, यात कुठेही 5 हा अंक नाही. 12346789 नंबर आहेत. या चित्रात 0 दोनदा दिसतोय आणि हे सगळे मिळून एकूण 10 आकडे आहेत.