मुंबई: ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम! हे एक प्रकारचे कोडे असते. हे कोडे सोडवण्यासाठी तुमचं निरीक्षण खूप चांगलं असायला हवं. ऑप्टिकल इल्युजनचे चित्र पाहिल्या पाहिल्या माणूस सर्वप्रथम गोंधळून जातो. नंतर शांत चित्ताने, एकाग्रतेने या चित्राकडे पाहिल्यास याचं उत्तर सापडतं. ऑप्टिकल इल्युजनची चित्रे तुमच्या व्यक्तिमत्त्वाविषयी बरंच काही सांगतात असे अनेक अभ्यासक सांगतात. आजकाल ही चित्रे इंटरनेटवर बरीच व्हायरल होतात. रोज एक ना एक ऑप्टिकल भ्रमाचं चित्र व्हायरल होतंच असतं. आजही असंच एक चित्र समोर आलंय. हे चित्र बघा आणि याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा.
हे चित्र बघा, या चित्रात तुम्हाला एक मांजर शोधायची आहे. या चित्रात रंगीबेरंगी घुबडे आहेत यातला एकही घुबड तुम्ही खऱ्या आयुष्यात पाहिला नसेल. पण आता हे मजेदार कोडे असल्यामुळे लॉजिक मध्ये न जाता आपण याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात. ही रंगीबेरंगी घुबडं बघा, यात हळूच एक मांजर जाऊन बसलंय. तुमच्यासाठी हेच कोडं आहे. तुम्हाला यात लपलेलं मांजर शोधायचं आहे.
तुम्हाला यात मांजर दिसलंय का? आता एक काम करा, या चित्राकडे सगळीकडून नीट बघा, वरून खालून, बाजूने, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे. यांच्या डोळ्यांकडे बघा, मांजराचे डोळे जरा वेगळे असतात. आता तरी तुम्हाला उत्तर सापडलं आहे का? कदाचित तुम्हाला मांजर आवडत असेल तर लवकर उत्तर सापडेल. मोजून 10 सेकंदात याचे उत्तर शोधा, उत्तर सापडत नसेल तर काळजी करू नका आम्ही याचे उत्तर खाली देत आहोत.