मुंबई: ऑप्टिकल भ्रम आपल्याला इतके गोंधळून टाकतात की एखादा माणूस कितीतरी दिवस जातील तरी ते कोडे सोडवू शकत नाही. ऑप्टिकल भ्रमांमध्ये वास्तव आणि काल्पनिक गोष्टी वेगळे करणे अवघड होऊन बसते. हे चित्र इतके विचित्र असते की कोडे सोडवणाऱ्यांना चित्रातील उत्तर शोधणे अवघड होऊन बसते. तज्ञांचा असा विश्वास आहे की ऑप्टिकल भ्रम क्रॅक केल्याने केवळ आपले निरीक्षण कौशल्य सुधारत नाही तर आपले डोकं देखील तेज होते.
गेल्या काही वर्षांत ऑप्टिकल इल्युजन हा नेटिझन्सचा आवडता छंद बनला आहे. लोकांची त्याबद्दलची आवड इतकी असते की ते इंटरनेटवर अशी कोडी स्वत:हून शोधून ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला चित्रात दडलेले कोडे सोडवणे अवघड जाते. पण हळूहळू ते या खेळात तज्ञही बनतात.
आपण या निरीक्षण कौशल्याच्या चाचणीसाठी तयार आहात का? असंख्य फुलांमध्ये मधमाशी शोधणे हे तुमचे काम आहे. तुम्हाला रंगीबेरंगी डेझीची फुले दिसतील. पण कुठेतरी एक मधमाशीसुद्धा या सुंदर फुलांवर भटकत आहे. तुम्ही या मधमाशीला ओळखू शकाल का? लक्षात ठेवा याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याकडे फक्त 10 सेकंद आहेत.
मधमाशी शोधण्यात यश आले असेल तर अभिनंदन. तुमच्याकडे अद्भुत निरीक्षण कौशल्य आहे. त्याचबरोबर जर तुमचं उत्तर नाही असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आम्ही खाली या कोड्याचे उत्तर देत आहोत. वेढा घातला आहे आणि मधमाशी कुठे आहे हे सांगितले आहे.