मुंबई: तुम्हाला या चित्रात सगळीकडे 8 हा अंक दिसेल. तुमच्यासाठी कोडे हे आहे की तुम्हाला यात 3 नंबर शोधायचा आहे. विशेष म्हणजे तुम्हाला हा आकडा मोजून 10 सेकंदात शोधायचा आहे. ऑप्टिकल इल्युजन हे एक प्रकारचे कोडे असते. यात तुमच्या निरीक्षणाचा कस लागतो. निरीक्षण कौशल्य चांगलं असल्यास तुम्हाला याचं उत्तर लगेचच सापडतं. ऑप्टिकल इल्युजनचं चित्र बघून सगळ्यात आधी तर माणूस गोंधळून जातो, गोंधळल्यामुळे उत्तर सापडत नाही. जर मन, डोकं शांत करून एकाग्र चित्ताने या चित्रात उत्तराचा शोध घेतला तर सगळं सहज शक्य आहे.
हे चित्र बघा. या चित्रात सगळीकडे एकच नंबर दिसेल तो म्हणजे 8! पण या सगळ्यात तुम्हाला 3 नंबर शोधायचा आहे. हा नंबर जितक्या लवकर तुम्हाला दिसेल तितके तुम्ही हुशार. एका अभ्यासानुसार ऑप्टिकल इल्युजन मुळे तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे ते कळून येतं. ऑप्टिकल इल्युजनचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. एखाद्या चित्रात तुम्हाला काहीतरी लपलेलं शोधायचं असतं. कधी कुठल्या चित्रातले फरक शोधायचे असतात तर कधी अजून काही शोधायचं असतं.
तुम्ही या आधी फरक शोधलेत, चित्र पाहिल्या पाहिल्या आधी काय दिसतंय ते सांगितलंय. आज तुम्हाला या चित्रात 3 हा आकडा शोधायचा आहे. तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? हे उत्तर शोधण्यासाठी जरा एकदा या चित्राकडे नीट बघा. ऑप्टिकल इल्युजनचं उत्तर शोधताना एक नियम पाळा, चित्राकडे बघताना डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे बारीक बघा. सगळीकडून नजर फिरवा. उत्तर सापडलं? नसेल सापडलं तर आम्ही याचं उत्तर खाली दाखवत आहोत.