मुंबई: आपण लहानपणी कोडी सोडवायचो आता हीच कोडी ऑनलाइन आलीयेत. या कोड्यांना ऑप्टिकल इल्युजन म्हणतात. या कोड्यांची उत्तरं शोधणं खूप कठीण असतं. यात कधी आपल्याला एखादी वस्तू शोधायची असते, कधी चित्रांमधील फरक ओळखायचा असतो. ही चित्रे सोडवताना कस लागतो. मेंदूची परीक्षा घेतली जाते. एका संशोधनात ऑप्टिकल इल्युजन व्यक्तिमत्त्व ओळखण्यासाठी सुद्धा उपयोगात येतात असं सांगितलं गेलंय. याला ब्रेन टिझर सुद्धा म्हटलं जातं.
मेंदूचा व्यायाम करण्यासाठी आपण अशा प्रकारची कोडी रोज सोडवायला हवीत. विशेष म्हणजे दिलेल्या वेळेत ही कोडी सोडवणे चॅलेंजिंग असतं. यात वेगवेगळ्या प्रकारची चित्रे असतात. ही चित्रे व्यक्तीला गोंधळून टाकतात. ज्याचं निरीक्षण कौशल्य चांगलं असतं त्यालाच हे उत्तर सापडतं. सध्या ऑप्टिकल इल्युजन इंटरनेटवर धुमाकूळ घालतायत.
या खास चॅलेंजमध्ये ‘पेट्रो’ या शब्दांमध्ये दडलेला ‘रेट्रो’ हा शब्द शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 15 सेकंद आहेत. तत्पर? सापडला का? तुम्हाला रेट्रो शब्दाच्या स्पेलिंगवर याठिकाणी फोकस करायचं आहे. तुम्हाला हा शब्द सापडला का? सापडला असेल तर अभिनंदन – तुमची निरीक्षण शक्ती चांगली आहे. जर तुम्हाला उत्तर दिसले नसेल, तर काळजी करू नका; आम्ही तुम्हाला मदत करू! खाली आम्ही या प्रश्नाचं उत्तर दाखवत आहोत.