Optical Illusion | कोडे! या चित्रात साप शोधून दाखवा

| Updated on: Sep 02, 2023 | 1:18 PM

कोडे सोडवण्यासाठी तुमचं निरीक्षण कौशल्य चांगलं असायला हवं. चित्रात तुम्हाला जे काय शोधायचं असेल त्यासाठी तुम्ही ते एका ठराविक वेळेत सोडवायला हवं. निरीक्षण कौशल्य चांगलं असेल तर काहीही शक्य आहे. उत्तर शोधण्यासाठी हे चित्र चारही बाजूने बघा.

Optical Illusion | कोडे! या चित्रात साप शोधून दाखवा
optical illusion find the snake
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हे एक कोडे असते. ऑनलाइन कोडे! हे कोडे सोडवताना खूप मजा येते. आजकाल तर ऑप्टिकल इल्युजन हा प्रकार सगळ्यात जास्त ट्रेंडिंग असणारा प्रकार आहे. लहानपणी आपण कोडे सोडवायचो, सगळी भावंडे जमली की एकच काम असायचं ते म्हणजे कोडे सोडवायचं. मग जो पटकन त्या कोड्याचं उत्तर सांगायचा तो हुशार ठरायचा. ऑप्टिकल इल्युजन सुद्धा हाच प्रकार आहे, जो याचं उत्तर लवकर शोधणार तो हुशार! विशेष म्हणजे या प्रकारची कोडी सोडवायला एक वेळ ठरवून दिलेली असते. या वेळेत तुम्हाला याचं उत्तर शोधायचं असतं. ऑप्टिकल भ्रमाचे चित्र, फोटो बघून माणूस आधी गोंधळून जातो. निरीक्षण कौशल्य चांगलं असेल तर कुणालाही ही चित्रे व्यवस्थित समजू शकतात.

गावागावांत गारुडी

आता हे चित्र बघा. या चित्रात एक माणूस पुंगी वाजवतोय. हे चित्र अतिशय सुंदर आहे. पुंगी वाजवणारा गारुडी पुंगी वाजवण्यात व्यस्त आहे. पूर्वी असे गारुडी गावागावांत असायचे. कदाचित तुम्हीही लहानपणी गारुडी, मदारी असे खेळ पाहिलेच असतील. हा सर्पमित्रच असे. आपल्याला पण असा खेळ बघून आश्चर्य वाटायचं. इतका भयानक प्राणी एखाद्याच्या तालावर नाचतो हे बघून आपण सुद्धा शॉक व्हायचो.

यात साप शोधायचा

आता या चित्रात असणारा साप तुम्हाला शोधायचा आहे. तुम्हाला पुंगी दिसेल, गारुडी दिसेल, एक गाव असल्याचं समजेल, शेजारी त्या गारुडीने आणलेली सापाची टोपली दिसेल. सगळं दिसेल पण साप कुठे आहे? हेच कोडे आहे, तुम्हाला यात साप शोधायचा आहे. तुमचं जर निरीक्षण चांगलं असेल तर तुम्हाला यात खूप लवकर साप दिसेल.

साप दिसतोय का?

तुम्हाला यात साप दिसतोय का? दिसला का? या चित्रात सगळीकडे नीट बघा. झाडाजवळ, भिंतीवर, खाली टाकलेल्या त्या बस्करवर, त्या समोरच्या टोपलीत, बाजूच्या टोपलीत. त्या पुंगीवरच तर साप नाहीये ना? आता जरा एक नजर त्या माणसावरच टाका. त्या माणसाच्या फेट्यात? त्याच्या शर्टवर? होय. या माणसाच्या शर्टवर तो साप आहे. अजूनही जर हा साप तुम्हाला दिसला नसेल तर आम्ही खाली त्याचं उत्तर दाखवत आहोत.

here is the snake