मुंबई: ऑप्टिकल इल्युजन ही खूप ट्रेंडिंग गोष्ट आहे. हे एक प्रकारचं कोडं आहे. आपण लहानपणी ही कोडी तोंडी सोडवायचो आता ही कोडी ऑनलाइन आलीयेत. या कोड्यांमध्ये पण अनेक प्रकार आहेत. कधी यात आपल्याला काहीतरी हरवलेलं शोधायचं असतं, कधी चुकलेलं! या चित्रांच्या साहाय्याने आपलं व्यक्तिमत्त्व सुद्धा ओळखलं जाऊ शकतं. एखाद्याचं व्यक्तिमत्त्व ओळखण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे असं म्हणायला हरकत नाही. आता हेच चित्र बघा. यात एकावेळी तुम्हाला एक नाही अनेक गोष्टी दिसतील. जी गोष्ट आधी दिसेल त्याप्रमाणे तुमचं व्यक्तिमत्त्व ठरेल.
हे चित्र बघा. या चित्रात तुम्हाला आधी काय दिसतंय? एकदा नजर टाका.
तुमच्या माहितीसाठी या चित्रात 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे फॉर्मल पँट घातलेला पाय दिसेल. दुसरं म्हणजे हिल्स घातलेला पाय दिसेल. आता कदाचित तुम्हाला आधी फॉर्मल पँट दिसेल किंवा आधी हिल्स दिसतील, कदाचित दोन्हीही सोबत दिसेल. हेच तुमचं व्यक्तिमत्त्व ठरवणार आहे. बघुयात काय आधी दिसल्यावर कशी असते पर्सनॅलिटी!
फोटोत तुम्हाला आधी फॉर्मल पँट आणि शूज दिसले तर तुम्ही लोकांशी थेट संवाद साधता. हे लोक मोकळे असतात आणि आपल्या भावना इतरांबरोबर सहजपणे व्यक्त करू शकतात. ते नेहमी इतरांच्या भावनांचा विचार करत नाहीत. सरळ बोलणारे असतात. त्यांना बरेचदा भावनिकदृष्ट्या उथळ लोक देखील म्हटले जाते.
जर तुम्ही आधी पांढऱ्या टाचांचे पाय पाहिले तर तुम्ही अशा प्रकारचे व्यक्ती आहात जे बोलण्यापूर्वी विचार करता. हे लोक बोलण्यासाठी वेळ घेतात कारण त्यांना पॉलिटिकली करेक्ट राहायचं असतं. त्यांना इन्ट्रोव्हर्ट किंवा लाजाळू मानले जाते.
याचा अर्थ आपण कृती करण्यापूर्वी विचार करता. आपण कधीकधी बोलताना अजिबात विचार करत नाही. बोलताना फिल्टर नसल्याने अनेकदा आपण उद्धट आणि ओपीनीएटेड वाटता. तुमच्याशी सगळ्यांना बराच वेळ बोलायला आवडते.