ऑप्टिकल इल्यूजनसाठी लोकं नेहमीच तयार असतात. आता हा सगळ्यांचा आवडता गेम झालाय. बसल्या बसल्या चित्रात काय लपलंय ते शोधून काढायचं. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आणि वयोवृद्धांनाही अशी चित्रं सोडवायला आवडतात, ज्यात आव्हान दिलं जातं. सोशल मीडियावर रोज नवनवीन ऑप्टिकल भ्रम येतात आणि मग लोकांची खेळण्याची उत्सुकता वाढते.
आणखी एका चित्राने इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय. या ऑप्टिकल भ्रम वाल्या चित्रात एक मांजर लपून बसलीये. मग यात अवघड काय आहे? अवघड हे आहे की ती मांजर 7 सेकंदात शोधायची आहे आणि फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे.
एक दीर्घ श्वास घ्या आणि पुढील 7 सेकंदांसाठी आपले लक्ष या चित्रावर केंद्रित करा. ज्या खोलीत अनेक वस्तू अस्ताव्यस्त पडून आहेत, अशी खोली या चित्रात दिसते.
चित्र ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे मांजर शोधणे अधिकच कठीण होईल. आपण पाहू शकता की चित्रात ख्रिसमस ट्री, काही फुले, एक तारा, एक सोफा, एक डायनिंग टेबल आणि माइक स्टँड आहे.
या पसाऱ्यात एक मांजर आहे जी अन्नाच्या शोधात आहे. आता आपल्याला 7 सेकंदाच्या आत मांजरीचा शोध घ्यावा लागेल.
ऑप्टिकल भ्रम प्रतिमा आपली निरीक्षण कौशल्ये सुधारण्यास मदत करतात. हे आपल्या मेंदूचा व्यायाम करण्याबरोबर आपली एकाग्रता सुधारते.
चित्रात लपलेली मांजर दिसली का? बरोबर मध्ये तुम्हाला एक खुर्ची दिसेल, त्या खुर्चीवर नॅपकिन आहे. त्याच खुर्चीच्या मागे बघा, तिथे मांजर दिसतीये. डोकं बाहेर काढून बसलीये ती मांजर, दिसली का?
चित्राच्या मधोमध मांजर खुर्चीच्या मागे लपलेली दिसते. ती खुर्चीवरून डोकावत आहे. सापडत नसेल तर, गरज आहे ती फक्त एकाग्रतेची.