ऑप्टिकल भ्रम म्हणजे मेंदूला गोंधळात टाकणाऱ्या प्रतिमा. अशा कोड्यांचे गूढ सोडविणे हा प्रत्येकाचा विषय नसतो. सर्वात मोठा तुर्रम खानही हार मानतो. या फोटोंच्या माध्यमातून तुमची आयक्यू लेव्हल तपासली जाते आणि तुमचा मेंदू खूप वेगाने काम करत असतो. आता हे चित्र बघा. आकाशात उडणारी विमाने, पॅराशूट आणि पतंग यांच्यामध्ये कुठेतरी पक्षीही आहे पण हे एक कोडं असल्यामुळे लोकांना तो दिसत नाही.
भ्रम असलेल्या प्रतिमांचे अनेक प्रकार आहेत. काही असे असतात, ज्यांना पाहून डोळे गोंधळून आणि डोकं हादरून जातं.
काही ऑप्टिकल भ्रम आपण एखाद्या प्रतिमेकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्रतिबिंबित करतात, तर काही आपले लपलेले व्यक्तिमत्त्व प्रकट करतात.
आज आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या ऑप्टिकल इल्यूजन टेस्टमध्ये तुम्हाला अनेक विमानं, पॅराशूट, पतंग, फुलपाखरे, सूर्य, छत्री आणि ढग दिसतील. पण कलाकाराने चतुराईने त्यात कुठेतरी पक्षी लपवला आहे. आव्हान म्हणजे 10 सेकंदात तुम्हाला त्या पक्ष्याला शोधून काढायचं आहे. मग उशीर कशासाठी? तयार व्हा आणि त्या पक्ष्याला शोधून काढा.
आम्हाला वाटतं तुम्हाला तो पक्षी सापडला असेल. त्याचबरोबर ज्यांना अजूनही पक्षी दिसत नाही, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. खाली आम्ही काउंटर फोटो देखील शेअर करत आहोत. एक संशोधन झालंय ज्यात असे म्हटले आहे की ऑप्टिकल भ्रमांसारखी आव्हाने ही आपली निरीक्षण कौशल्ये तसेच आपला IQ तपासण्याचा एक मनोरंजक मार्ग आहे.