सोशल मीडियावर विविध प्रकारचे मजेशीर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले जातात. यातील काही ऑप्टिकल भ्रम आहेत. ऑप्टिकल भ्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्याला फसवण्यासाठी ओळखले जातात. अशा चित्रांमुळे आपण जे पाहतो ते सत्य आहे, असा विश्वास वाटतो, तर तसे मुळीच नसते. असाच एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये बदक कुठे लपले आहे हे आपल्याला शोधायचंय.
प्रत्यक्षात या चित्रात असे दिसून येते की, समोर एक टब आहे जिथे कपडे धुण्याची तयारी केली जात आहे आणि त्याच्या वर बुडबुडे बाहेर येत आहेत. वरती बरेच बुडबुडे दिसतायत. हे बदक या चित्रात बनवण्यात आलं आहे.
चित्रात तुम्हाला हे बदक शोधून ते कुठे आहे ते सांगावे लागेल. ऑप्टिकल भ्रमाचे हे चित्र गोंधळून टाकणारे आहे.
या चित्राची गंमत म्हणजे हे बदक अजिबात दिसत नाही. चित्रात असे दिसते की, टबभोवती सर्व बुडबुडे उडत आहेत. पण सगळ्या बुडबुड्यांच्या मध्येच त्यात बदक आहे. पण जर तुम्हाला हे बदक सापडलं, तर तुम्ही खूप हुशार आहात. बदक कुठे आहे, हे आम्ही पुढे सांगत आहोत.
या चित्रात हे बदक एका बुडबुड्याच्या मध्यभागीच आहे. नीट पाहिलं तर टबच्या उजव्या बाजूच्या अगदी खाली तयार होणाऱ्या बुडबुड्यात हे बदक तयार होतं. ते दिसणार नाही, असं चित्र घेऊन बदक बनवलेलं आहे, पण नीट निरखून पाहिलं तर बदक कुठे आहे ते कळतं.