यावेळी आम्ही तुमच्यासाठी ऑप्टिकल इल्यूजनमध्ये काहीतरी नवीन घेऊन आलोय. तुम्हाला मासा शोधायचा आहे. ऑप्टिकल भ्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्याला फसवण्यासाठी ओळखले जातात. अशा चित्रांमुळे आपण जे पाहतो ते सत्य आहे, असा विश्वास वाटतो, तर तसे मुळीच नसते. असेच काहीसे चित्र आहे.
चित्रात घराच्या एका खोलीत एक मांजर बसलेली असून तिच्याभोवती अनेक वस्तू विखुरलेल्या दिसतात. दरम्यान, फोटोमध्ये मासाही दिसत आहेत. हा मासा चित्रात शोधून काढा आणि तो कुठे आहे ते सांगा. ऑप्टिकल भ्रमाचे हे चित्र मनाला चटका लावणारे आहे.
या चित्राची गंमत म्हणजे हा मासा अजिबात दिसत नाही. चित्रात घराच्या या खोलीत अनेक वस्तू मांजराच्या आजूबाजूला पडून असल्याचं दिसतंय. पण या सर्व गोष्टींमध्ये मासा दिसत नाही. पण जर तुम्हाला हा मासा सापडला तर तुम्हाला एक प्रतिभावान म्हटले जाईल.
खरं तर या चित्रात हा मासा तळाशी उजव्या बाजूला आहे. सत्य हे आहे की, त्या खोलीत पडलेल्या घागरीवर मासा काढलेला आहे. नीट निरखून पाहिलं तर मडक्यावर त्या मधल्या पट्टीत तो मासा काढलेला आहे. नीट निरखून पाहिले तर तो मासा कुठे आहे हे कळू शकेल.