ऑप्टिकल इल्युजन हे एक मॉडर्न कोडं आहे. ऑप्टिकल इल्यूजनच्या प्रतिमांमुळे आपण जे पाहतो ते सत्य आहे, असा आपल्याला विश्वास वाटतो, तर तसे मुळीच नाही. या चित्रात लुडोचा ठोकळा लपलेला आहे आणि तुम्हाला हाच ठोकळा शोधायचा आहे.
खरं तर या चित्रात चीज आणि उंदीर दिसत आहेत. तिथे पडलेल्या पिवळ्या रंगाच्या वस्तूभोवती उंदीर घिरट्या घालत असतात.
या सगळ्यामध्ये पिवळ्या रंगाचा लुडोचा ठोकळाही आहे. चित्रात हा ठोकळा शोधून तो कुठे आहे ते सांगावे. हे कोडं खूप भन्नाट आहे. निरीक्षण कौशल्य चांगलं असेल तर नक्कीच तुम्हाला हा ठोकळा सापडेल.
या चित्राची गंमत म्हणजे हा पिवळा ठोकळा अजिबात दिसत नाही. चीज चे क्यूब सुद्धा पिवळ्या कलरचे, लुडोचा ठोकळा सुद्धा त्याच कलरचा. त्यामुळे हे अवघड जातं.
आता जर तुम्हाला उत्तर सापडलं असेल तर ठीक आणि समजा नसेल सापडलं तर उजव्या कोपऱ्यात तिसऱ्या ओळीत एक पिवळ्या रंगाचा ठोकळा पडलाय.