मुंबई: ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच कोडे. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम. या चित्रांना भ्रम का म्हणतात? कारण आपण जेव्हा पहिल्यांदा हे चित्र बघतो तेव्हा आपण गोंधळून जातो. जे आपल्याला या चित्रामध्ये दिसतं तेच सत्य असेल असं नाही, सत्य काहीतरी वेगळंच असतं. या कारणामुळेच या चित्रांना ऑप्टिकल भ्रम असं म्हटलं जातं, हे भ्रम तयार करतात. ऑप्टिकल इल्युजन सारख्या कोड्यांमध्ये अनेक प्रकार असतात. कधी तुम्हाला या चित्रांमध्ये जय लपलं आहे ते सांगायचं असतं. कधी या चित्रांमधील फरक सांगायचा असतो तर कधी यात ऑड असणारं काहीतरी दाखवून द्यायचं असतं. स्पेलिंग, नंबर, वेगवेगळे चित्र, रेषा असं बरंच काय काय या चित्रांमध्ये असतं. ऑप्टिकल इल्युजनमुळे मेंदूचा व्यायाम होतो.
हे चित्र बघा. या चित्रात तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे. हा शब्द शोधताना निरीक्षण कौशल्य चांगलं असायला हवं. तुम्हाला अशा पद्धतीची कोडी आवडत असतील आणि तुम्हाला याचं उत्तर शोधणं कठीण जात असेल तर तुम्ही ऑप्टिकल इल्युजन सोडवायचा सराव करायला हवा. ही अशी कोडी सरावाने सुटली जाऊ शकतात. विशेष म्हणजे हे कोडं तुम्हाला दिलेल्या वेळात म्हणजे दहा सेकंदात सोडवून दाखवायचं आहे.
आता हे चित्र बघा. यात तुम्हाला ऑड असं काही दिसतंय का? या चित्रात तुम्हाला एकच शब्द दिसेल तो म्हणजे LET. या शब्दांमध्ये वेगळा शब्द कोणता आहे? तो कुठे आहे? हे तुम्हाला सांगायचं आहे. काही अभ्यासकांच्या मतेऑप्टिकल इल्युजमुळे तुमचं व्यक्तिमत्त्व कळून येतं. ऑप्टिकल भ्रम तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्त्व, तुमचा स्वभाव सांगू शकतं. लहानपणी आपण अशा पद्धतीची कोडी ऑफलाईन सोडवायचो. कुणीतरी येऊन आपल्याला तोंडी कोडी घालायचं आणि आपण सुद्धा तोंडी उत्तर द्यायचो. आता हीच कोडी ऑनलाइन उपलब्ध असतात. तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? सापडलं असेल तर, अभिनंदन! नसेल सापडलं तर काळजी करू नका आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.