ऑप्टिकल इल्युजनचा किडा हल्ली नेटकऱ्यांमध्ये पाहायला मिळतो, कारण गोंधळात टाकणाऱ्या चित्राचं सत्य समजून घ्यायला काही लोकांना तास लागतात. असे काही लोक आहेत जे काही सेकंदात उत्तर शोधू शकतात. अशा लोकांचं निरीक्षण कौशल्य खूप चांगलं असतं. ऑप्टिकल भ्रम कोणत्याही आकारात आणि स्वरूपात असू शकतात – जसे की चित्र, कोडे, ब्रेन टीझर, चित्रकला आणि बरेच काही. आज आम्ही तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन आलो आहोत, जे पाहून तुम्हाला वाटेल, यात उत्तर कसं शोधायचं? तुम्ही पत्ते खेळत असाल किंवा तुम्हाला पत्ते खेळायची आवड असेल तर कदाचित तुम्हाला याचं उत्तर लवकर सापडू शकतं.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो रेड डायमंडचा आठवा नंबर आहे. आता लोकांसमोर आव्हान आहे ते म्हणजे चित्रात दोन आठ अंक देण्यात आले आहेत, पण आता तिसरा आठवा क्रमांक शोधून दाखवावा लागेल.
शोधण्यासाठी, आपल्याकडे केवळ 7 सेकंदांचे वेळ आहे. पत्त्यावर फक्त दोन 8 आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. पत्त्यावर तिसरा नंबर 8 देखील दाखवण्यात आला आहे. ते ओळखण्याचा प्रयत्न करा.
कार्डच्या वरच्या डाव्या आणि खालच्या उजव्या कोपऱ्यात 8 हा क्रमांक दोन वेळा दिसतो. आता तिसरा क्रमांक शोधण्यासाठी काळजीपूर्वक पाहावे लागेल.
लाल डायमंडच्या आकाराकडे नीट पाहिलं तर त्यात आतमध्ये तुम्हाला एक आकार दिसेल, जो आकार 8 नंबरचा आहे. मध्यभागी 8 आकार दिसेल.
ब्रिटन गॉट टॅलेंटमध्ये सहभागी झालेल्या जेमी रेव्हनने ट्विटरवर ही अफलातून युक्ती पोस्ट केली आहे. मात्र हा जुना भ्रम असून हे ट्विट 2018 मध्ये करण्यात आलं होतं. त्याचबरोबर या भ्रमाने लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला.