हे चित्र मायावी! बिबट्या दिसता दिसत नाही, फोटोग्राफर म्हणतो, “डोळ्यासमोरच आहे”

| Updated on: Dec 23, 2022 | 9:55 AM

हे मायावी चित्र पाहिल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रियांचा भडीमार झाला आहे.

हे चित्र मायावी! बिबट्या दिसता दिसत नाही, फोटोग्राफर म्हणतो, डोळ्यासमोरच आहे
find the leopard
Image Credit source: Social Media
Follow us on

ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे डोळ्यांची फसवणूक. हल्ली सोशल मीडियावर असे फोटोज पसरवले जात आहेत. ही चित्रं तुम्हाला अगदी सामान्य वाटतील, पण प्रत्यक्षात मात्र या चित्रांकडे पाहिलं की गोंधळ उडतो. कधीकधी हे चित्र इतके गोंधळून टाकणारे असतात की आपण नुसतं बघतच बसतो आणि उत्तर सापडतच नाही. या चित्रांमध्ये काहीतरी दडलेलं आहे आणि लोकांना ते शोधण्याचं आव्हान दिलं जातं. पण कलाकार ते इतके चाणाक्षपणे बनवतात की, त्याचं गूढ शोधण्यासाठी प्रचंड विचार करावा लागतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक रंजक फोटो समोर आला आहे, जो तीक्ष्ण डोळ्याची परीक्षा घेण्याचा दावा करत आहे. चित्रात कुठेतरी बिबट्या लपला आहे, पण सर्व प्रयत्न करूनही तो लोकांना दिसत नाही.

वाइल्डलाइफ फोटोग्राफर हेमंत दाबी यांचा फोटो ट्विटरवर शेअर @fasc1nate नावाच्या हॅण्डलसोबत शेअर करण्यात आला आहे, ज्यात बिबट्या कुठेतरी लपलेला दिसत आहे.

वापरकर्त्याने लोकांना विचारले आहे की, तुम्हाला बिबट्या सापडेल का? हे एखाद्या जागेचे काढलेले चित्र आहे. ज्यामध्ये तुम्हाला झाड, माती दिसेल. पण कुठेतरी बिबट्याही तिथे बसलेला आहे.

बिबट्याचा आणि जमिनीचा रंग इतका एकसारखा आहे की तो लोकांना सहजासहजी दिसत नाही. त्यामुळे हे आव्हान पेलण्यासाठी तुम्ही तयार आहात का? पण तुमच्याकडे फक्त 10 सेकंद आहेत.

दोन दिवसांपूर्वी ट्विटरवर शेअर केलेल्या या पोस्टला 1.9 लाखांहून अधिक लाईक्स आणि 16,000 हून अधिक रिट्वीट मिळाले आहेत.

हे मायावी चित्र पाहिल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रियांचा भडीमार झाला आहे. काही लोकांना बिबट्या दिसल्याचं या कमेंटमधून दिसतंय, तर अनेकांना आपली थट्टा मस्करी केली जात असल्याचं वाटतंय. विश्वास ठेवा, या चित्रात बिबट्या तुमच्या डोळ्यांसमोरच बसला आहे.

वन्यजीव छायाचित्रकार हेमंत दाबी यांनी 2019 मध्ये हा फोटो क्लिक केला होता, जो आता पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फोटोग्राफरने दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी ते बिबट्यापासून केवळ सात फूट अंतरावर होते आणि त्यांना ते दिसतही नव्हते. बिबट्याने शेपटी हलवली, तेव्हा तो त्यांना दिसत होता, असे फोटोग्राफरचे म्हणणे आहे.