ऑप्टिकल भ्रम आपल्या डोळ्यांची आणि मेंदूची फसवणूक करण्यासाठी ओळखले जातात. अशा चित्रांमुळे आपण जे पाहतो ते सत्य आहे, असा विश्वास वाटतो, तर तसं मुळीच नसते. या चित्रात आपल्याला डॉल्फिन शोधायचा आहे. हे एक प्रकारचं कोडं आहे. मॉडर्न कोडं! प्रचंड डोकं लावावं लागतं, निरीक्षण कौशल्य पणाला लागतं.
या चित्रात समुद्रकिनारा आहे आणि इथे बसलेले सर्व लोक उन्हात बसलेले आहेत. यात काही मुलेही खेळताना दिसतायत.
यात काही महिलाही निवांत बसलेल्या दिसतायत.या चित्रात डॉल्फिन कुठे आहे ते शोधून दाखवावे. ऑप्टिकल भ्रमाचे हे चित्र खूप विचार करायला लावणारे आहे.
या चित्राची गंमत म्हणजे हा डॉल्फिन अजिबात दिसत नाही. चित्रात अनेक जण चटईवर बसलेलेही दिसतात त्यांनी वर छत्र्या आहेत.
या सगळ्या गोष्टींमध्ये डॉल्फिन दिसत नाही. पण जर तुम्हाला हा डॉल्फिन सापडला तर तुम्ही खूप हुशार आहेत असं म्हणायला हरकत नाही.
खरं तर या चित्रात हा डॉल्फिन एका चटईवर दिसतो. हा डॉल्फिन खरा खुरा नाही. हे चित्र आहे. एक मुलगी गडद चॉकलेटी रंगाचा शॉर्ट घालून चटईवर बसलेली आहे.
त्याच चटईवर डॉल्फिनचं चित्र आहे. नीट निरखून पाहिले तर डॉल्फिन कुठे आहे, हे कळते. त्या मुलीने चॉकलेटी रंगाचे कपडे घातलेले आहेत.