Optical Illusion | हे चित्र बघा, यात तुम्हाला हत्ती दिसतोय का?

| Updated on: Sep 05, 2023 | 7:17 PM

हे किचकट चित्र बघा. बघूनच तुम्हाला टेन्शन येईल कारण इतक्या किचकट चित्रामध्ये तुम्हाला शोधायचा आहे हत्ती! चित्र नीट निरखून बघा. सगळ्या बाजूने बघा, तुम्हाला हत्ती दिसतोय का? कुठेतरी तुम्हाला हत्तीची आकृती दिसत असावी? दिसली तर हेच तुमचं उत्तर आहे.

Optical Illusion | हे चित्र बघा, यात तुम्हाला हत्ती दिसतोय का?
spot the elephant
Follow us on

मुंबई: ऑप्टिकल इल्युजनमध्ये आपल्याला जे दिसतं तेच खरं असतं असं नसतं. वास्तव वेगळं असल्याने ऑप्टिकल भ्रम आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन देतं. हे एक प्रकारचे कोडे असते. हे कोडं सोडवायला खूप वेळ लागतो. भले भले लोकं या कोड्याचं उत्तर शोधू शकत नाहीत. ज्यांना याचं उत्तर येतं त्यांचं मात्र निरीक्षण चांगलं असतं आणि ते खरोखर हुशार असतात. तुमच्या लक्षात असेल की लहानपणी आपण सुट्ट्यांमध्ये कोडी सोडवत बसायचो. अशीच काहीशी ही कोडी असतात. ही कोडी आधी आपण तोंडी सोडवायचो आता ही कोडी ऑनलाइन असतात ज्याला आपण ऑप्टिकल इल्युजन म्हणतो. यात अनेक प्रकार असतात. ही चित्रे पाहिली की आधी आपण गोंधळून जातो. याचं उत्तर शोधणे आपल्यासाठी कठीण असते.

हत्ती कुठे आहे हे शोधायचंय

ऑप्टिकल इल्युजन म्हणजे प्रचंड गोंधळ उडवणारं चित्र! हे चित्र समोर पाहिलं की आपल्याला आधी याचं नीट निरीक्षण करावं लागतं. यात नेमकं काय लपलंय हे बघावं लागतं. हे चित्र बरेचदा मोठमोठ्या चित्रकारांनी रेखाटलेले असतात त्यामुळेच या चित्राचा गोंधळ लवकर सुटत नाही. आता हे चित्र बघा, किती अवघड आहे हे? हे चित्र बघताना तर इतकं किचकट आहे की यात नेमकं काय आहे हे दिसणारच नाही. पण यात हत्ती आहे. हा हत्ती कुठे आहे हे आपल्याला शोधायचं आहे.

आम्ही खाली उत्तर देत आहोत

या किचकट चित्रात हत्ती कुठे आहे असा तुम्हाला प्रश्न पडेल. चित्र जरा अवघड आहे पण सगळ्या बाजूने, व्यवस्थित, नीट निरखून पाहिल्यास तुम्हाला हत्ती दिसण्याची शक्यता आहे. अशा चित्रांचं उत्तर शोधण्यासाठी हे चित्र आपल्याला एकदा सरळ, एका उलटं, एकदा आडवं, एकदा उभं असं बघावं लागतं. तुम्हाला या चित्रात हत्ती दिसला का? आधी बघताना यात दगड दिसतात, यातच आपल्याला हत्ती शोधायचा आहे. तुम्हाला जर हत्ती दिसला असेल तर तुमच्या इतकं हुशार कुणीच नाही. पण जर तुम्हाला हत्ती दिसला नसेल तर हरकत नाही आम्ही खाली उत्तर देत आहोत.

elephant