मुंबई: ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच कोडे. आपण लहानपणी कोडी सोडवायचो ही कोडी आधी तोंडी सोडवली जायची. कुणी एकजण आपल्याला तोंडी कोडी घालायचं आपण ती सोडवायचो. आता ही कोडी ऑनलाइन आलीयेत. याच ऑनलाइन कोड्यांना ऑप्टिकल भ्रम म्हणतात. ऑप्टिकल भ्रम सोडवण्यासाठी निरीक्षण चांगलं असायला हवं. ऑप्टिकल इल्युजनमध्ये प्रथमदर्शनी आपल्याला जे दिसतं तेच खरं असतं असं नाही. अतिशय किचकट अशी ही चित्रे मेंदूचा व्यायाम करवून घेतात. तुम्हाला मेंदू फ्रेश करायचा असेल तर अशी कोडी नक्कीच सोडवावीत. ऑप्टिकल भ्रम माणसाचं व्यक्तिमत्त्व तपासतात. विशेष म्हणजे हे चित्र लवकरात लवकर सोडवायचं असतं. आता हे कोडं बघा आणि तुम्हाला याचं उत्तर सापडतंय का सांगा.
या चित्रात 20 सेकंदात तुम्हाला 9 हा अंक शोधून दाखवायचा आहे. हे चित्र बघा, कोडे सोडवायचे म्हणजे ते लवकरात लवकर सोडवता यायला हवे. या कोड्यात काय शोधायचं आहे हे लक्षात आलंय का? यात तुम्हाला 9 हा अंक शोधायचा आहे. आम्ही सांगतो याचं उत्तर कसं शोधतात. यात तुम्हाला सगळे शून्यच दिसतील. आता एक एक ओळ व्यवस्थित बघा. वरून-खाली, डावीकडून उजवीकडे बघत जा. तुम्हाला 9 हा अंक शोधायचा आहे हे डोक्यात ठेवा. अंक दिसला?
जर तुम्हाला याचं उत्तर दिसलं असेल तर तुमच्या इतकं हुशार कुणीच नाही. पण तुम्हाला याचं उत्तर दिसलं नसेल तर तुमच्या माहितीसाठी ही एक फिरकी आहे. होय. हे कोडे आहे आणि कोड्यात उत्तर कुठेही, अगदी कुठेही दडलेलं असू शकतं. यात जो प्रश्न विचारला गेलाय त्या प्रश्नाव्यतिरिक्त 9 हा अंक कुठेच नाहीये. होय, आहे ना स्मार्ट प्रश्न? पण तुम्ही लक्षात ठेवा की कोड्याची उत्तरे अशी देखील असतात. या प्रश्नात लपलंय कोड्याचं उत्तर. आम्ही देखील तुम्हाला याचं उत्तर खाली देत आहोत.
here is the 9