मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हे एक प्रकारचे कोडे असते. लहानपणी आपण ही कोडी तोंडी सोडवायचो आता ही कोडी ऑनलाइन आली आहेत. ही कोडी भन्नाट असतात. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम. या चित्रांना भ्रम का म्हटलं जातं? आपण या चित्रात प्रथमदर्शनी जे पाहतो तेच सत्य असतं असं नसतं. सत्य काहीतरी वेगळंच असतं. ऑप्टिकल भ्रम गोंधळात टाकणारे असतात. चित्र पाहिल्या पहिल्या आधी लोकांचा गोंधळ उडतो. याचं उत्तर शोधण्यासाठी डोकं शांत, मन एकाग्र करावं लागतं. ऑप्टिकल इल्युजनमुळे मेंदूचा व्यायाम होतो. या कोड्यांचे अनेक प्रकार असतात. कधी या चित्रात पक्षी शोधायचा असतो, कधी प्राणी, कधी अंक, कधी अक्षर तर कधी चेहरे सुद्धा शोधावे लागतात. किचकट असलं तरीही निरीक्षण जर चांगलं असेल तर सहज उत्तर सापडू शकतं.
हे चित्र बघा, या चित्रामध्ये तुम्हाला वेगळा दिसणारा मुलगा शोधायचा आहे. आपल्याला अनेकदा ऑप्टिकल इल्युजनमध्ये चित्रातील फरक ओळखा असं देखील सांगितलं जातं. आता हे चित्र बघा या चित्रात तुम्हाला अनेक मुलं दिसतील. यात तुम्हाला वेगळा दिसणारा मुलगा शोधायचा आहे. चित्र जर तुम्ही नीट निरखून पाहिलंत तर तुम्हाला याचं उत्तर सहज सापडू शकतं. विशेष म्हणजे हा मुलगा तुम्हाला कमीत कमी वेळात शोधायचा आहे.
तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? आम्ही सांगतो उत्तर कसं शोधायचं…. या चित्रात खूप मुले आहेत. आता या प्रत्येक मुलाचा एक-एक अवयव बघा. आधी हात, पाय, टीशर्ट, पँट, चेहरा, स्माइल सगळं एक-एक करून नीट बघा. बरेचदा अशी वेगळी व्यक्ती शोधायची असल्यास एक अवयव आणि कपडे पाहिले तर तुम्हाला त्यातच फरक दिसून येऊ शकतो. आता तरी तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन! जर उत्तर सापडलं नसेल तर आम्ही तुम्हाला याचं उत्तर खाली देत आहोत.