मुंबई: ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम. हे भ्रम म्हणजे मॉडर्न कोडे. आपण लहानपणी कोडे सोडवायचो. ही कोडी आपण तोंडी सोडवायचो. समोरचा आपल्याला ही तोंडी विचारायचा आपण सुद्धा तोंडीच सांगायचो. ऑप्टिकल इल्युजन हा कोड्यांचा नवा प्रकार आहे. ही ऑनलाइन असतात. ऑप्टिकल इल्युजन खूप किचकट असतात. ही कोडी सोडवल्याने मेंदूचा व्यायाम होतो. जर तुम्हाला याचं उत्तर शोधता येत नसेल तर तुम्ही रोज एक ऑप्टिकल इल्युजन सोडवायचा सराव करू शकता. ऑप्टिकल भ्रमाचे अनेक प्रकार असतात. या प्रकारांमध्ये कधी आपल्याला नंबर शोधावा लागतो, कधी अक्षर तर कधी चेहरा शोधायचा असतो. निरीक्षण कौशल्य चांगलं असेल तर सहजच याचं उत्तर शोधता येतं. हे ऑप्टिकल भ्रम जरा हटके आहे, कदाचित या प्रकारचं भ्रम तुम्ही आधी कधीही पाहिलं नसेल.
आता हे चित्र बघा, या चित्रात तुम्हाला move हा शब्द शोधायचा आहे. या चित्रात खूप अक्षरं आहेत. सर्वात आधी हे चित्र पाहिल्यावर माणूस गोंधळून जातो. इल्युजनच्या कुठल्याही चित्राकडे बघून माणूस गोंधळून जातो कारण या चित्रांचा मूळ उद्देशच हा असतो. ऑप्टिकल भ्रमात प्रथमदर्शनी जे दिसतं तेच सत्य असतं असं नाही. सत्य काहीतरी वेगळंच असतं. या चित्रात तुम्हाला move शब्द शोधून सांगायचा आहे.
आम्ही सांगतो या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं? या प्रश्नाचं उत्तर शोधताना जो शब्द तुम्हाला शोधायचा आहे त्याचं स्पेलिंग माहिती असायला हवं. हे स्पेलिंग प्रश्नातच दिलं असल्यामुळे ते लक्षात ठेवा आणि त्या दृष्टीने हा शब्द शोधा. डावीकडून उजवीकडे हे चित्र नीट बघा. एकदा वरून-खाली पटापट बघत या. आता तुम्हाला हा शब्द सापडलाय का? जर तुमचं निरीक्षण चांगलं असेल तर तुम्हाला हे चित्र पाहिल्या पाहिल्याच हा शब्द सापडेल. जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन! जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं नसेल तर काळजी करू नका आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.