मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हा खूप किचकट प्रकार असतो. लहानपणी आपण ही कोडी सोडवायचो, ही कोडी तेव्हा तोंडी असायची. समोरचा आपल्याला तोंडी प्रश्न विचारायचा आणि आपण तोंडी उत्तर द्यायचो. आता मात्र ही कोडी ऑनलाइन आली आहेत याच कोड्यांना ऑप्टिकल इल्युजन म्हणतात. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच भ्रम, भ्रम का म्हटलं जातं? प्रथमदर्शनी जेव्हा हे चित्र पाहिलं जातं तेव्हा जे दिसतं तेच सत्य असतं असं नसतं. सत्य काहीतरी वेगळंच असतं. ऑप्टिकल इल्युजन हे खूप किचकट असतात. या किचकट प्रश्नांचं उत्तर शोधायचं असेल तर तुमचं निरीक्षण कौशल्य चांगलं असायला हवं. निरीक्षण कौशल्य चांगलं करायचं असेल तर त्यासाठी सराव असायला हवा. जर तुम्ही ऑप्टिकल इल्युजन रोज सोडवलं तर तुम्हाला याचं उत्तर सहज सापडेल.
हे चित्र बघा, व्हायरल होणारं चित्र खूप किचकट आहे. या चित्रात तुम्हाला कुत्रं शोधायचं आहे. ऑप्टिकल भ्रम पहिल्यांदा बघून आपला गोंधळ उडतो. हे चित्र बघून तुमचाही गोंधळ उडेल. ऑप्टिकल भ्रम सोडवताना डोकं शांत आणि मन एकाग्र हवं. डोकं शांत ठेवलं की याचं उत्तर सहज सापडू शकतं. ऑप्टिकल भ्रमात अनेक प्रकार असतात यात कधी प्राणी शोधायचा असतो, कधी पक्षी तर कधी एखादा शब्द. कधीतरी दोन चित्रांमधील फरक शोधून सांगायचा असतो तर कधी यात लपलेले चेहरे कुठे आहेत ते सांगायचं असतं.
या चित्रात तुम्हाला कुत्रा शोधायचा आहे. हे एक काढलेलं चित्र आहे. या चित्रात कुत्रा शोधायचा म्हणजे आधी तुम्हाला कुत्र्याचा आकार लक्षात घ्यावा लागेल. कारण अर्थातच या चित्रामध्ये कुत्र्याचा आकार शोधायला लागणार आहे. कुत्र्याचा आकार शोधायला तुम्हाला तो कमी वेळात शोधून काढायचा आहे. तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? हे चित्र डावीकडून उजवीकडे नीट बघा, वरून-खाली नीट बघा. आता तरी तुम्हाला यात कुत्रा दिसलाय का? जर दिसला असेल तर अभिनंदन! नसेल दिसला तर आम्ही याचं उत्तर खाली दाखवत आहोत.