मुंबई: ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम हे एक प्रकारचे कोडे असते. लहानपणी आपण ही कोडी तोंडू सोडवायचो आता ही कोडी ऑनलाइन आलीयेत. ऑप्टिकल इल्युजनचे अनेक प्रकार असतात. यात कधी तुम्हाला कुठली वस्तू शोधायची असते तर कधी दोन चित्रांमधील फरक शोधायचा असतो. या प्रकारची कोडी खूप किचकट असतात. ज्या लोकांचं निरीक्षण चांगलं हं त्या लोकांना या प्रश्नांची उत्तरे लगेच सापडतात. ऑप्टिकल इल्युजनने मेंदूचा व्यायाम होतो. अभ्यासक म्हणतात की ऑप्टिकल इल्युजनमुळे तुमचं व्यक्तिमत्त्व कळून येतं. आता हे चित्र बघा, दरवेळी एखादी वस्तू, एखादं चुकीचं स्पेलिंग, एखादा नंबर शोधायचा असतो आज या चित्रात तुम्हाला चेहरा शोधायचा आहे.
हे चित्र बघा, या चित्रात तुम्हाला चेहरा शोधायचा आहे. या चित्रात एक माणूस शेतात उभा आहे तो काहीतरी शोधतोय. हे एक शेत आहे, मागे घर आहे, झाड आहे. या माणसाने हॅट घातलीये. या दाढीवाल्या बाबाने निळ्या रंगाचं जॅकेट घातलंय. हा दूरवर काहीतरी बघतोय. ऑप्टिकल इल्युजन आपली परीक्षा घेतं. आजकाल अशी चित्रे सोशल मीडियावर खूप व्हायरल झालीयेत. यात तुम्हाला चेहरा दिसलाय का? या माणसाच्या चेहऱ्या व्यतिरिक्त इथे आणखी एक चेहरा आहे. हाच चेहरा तुम्हाला शोधायचा आहे.
तुम्हाला याचं उत्तर सापडलंय का? या चित्रात नीट बघा, चेहरा दिसला? आम्ही सांगतो याचं उत्तर कसं शोधतात. या चित्राकडे नीट बघा. डावीकडून-उजवीकडे, वरपासून-खालीपर्यंत नीट बघा. चेहऱ्याची आकृती शोधायला लावली असेल तर बरेचदा अशी आकृती कुठेतरी दडलेली असते. मागच्या गवतामध्ये, झाडात, घरावर कुठेतरी ही चेहऱ्याची आकृती दिसत असेल. कळेल अशीच ही आकृती असते. आधी चेहऱ्याची आकृती कशी असते हे डोक्यात आणा आणि त्या दृष्टीने उत्तराचा शोध घ्या.