मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हे एक कोडे असते. लहानपणी आपण ही कोडी तोंडी सोडवायचो आता ही कोडी ऑनलाइन आलेली आहेत. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम. या चित्रात प्रथमदर्शनी जे दिसतं तेच सत्य असतं असं नाही. ऑप्टिकल इल्युजन खूप किचकट असतं. या चित्राकडे पाहिलं की आधी माणसाचा गोंधळ उडतो. डोकं शांत आणि मन एकाग्र केलं की या चित्राचं उत्तर सहज दिसू शकतं. ऑप्टिकल इल्युजमध्ये अनेक प्रकार असतात. कधी यात आपल्याला एखादा अंक शोधायचा असतो, कधी एखादं अक्षर शोधायचं असतं तर कधी या चित्रातील चेहरे शोधायचे असतात. अनेक पद्धतीचे प्रश्न असणाऱ्या ऑप्टिकल इल्युजनवर उपाय एकच असतो, उत्तम निरीक्षण कौशल्य! बारीक निरखून बघा आणि उत्तर शोधा, सोप्पंय!
हे चित्र बघा, ऑप्टिकल इल्युजनच्या या चित्रात तुम्हाला money हा शब्द शोधायचा आहे. तुम्ही बघू शकता की या चित्रात honey लिहिलेलं आहे. honey लिहिलेल्या या चित्रात तुम्हाला money शोधायचं आहे. हे उत्तर तुम्हाला लवकरात लवकर शोधायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचं उत्तर कसं शोधायचं? आम्ही तुम्हाला सांगतो याचं उत्तर कसं शोधतात. एक-एक ओळ तुम्ही नीट पाहिली तर तुम्हाला हा शब्द नक्की सापडू शकतो. वरून-खाली, डावीकडून उजवीकडे नीट बघा, थोडं फास्ट बघा म्हणजे उत्तर सुद्धा तितक्याच फास्ट सापडेल.
तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? याचं उत्तर शोधणं म्हणजे निरीक्षण कौशल्याचा कस लागतो. आता या चित्रात डावीकडून उजवीकडे बघा, वरून-खाली बघा. एक-एक शब्द नीट पाहिला तर तुम्हाला money हा शब्द नक्की सापडेल. आता तरी तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? इतक्या शब्दांमध्ये हा शब्द शोधायचा म्हणजे कसरत आहे पण या दोन शब्दांमध्ये फक्त सुरुवातीचं अक्षर वेगळं आहे. सुरवातीला जिथे H आहे तिथे M हवाय. कोडे सोडवायचे असले तरीही त्याला वेळेचं बंधन आहे. जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन! नसेल सापडलं तर आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.