मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हा एक कोड्याचा प्रकार असतो. लहानपणी आपण ही कोडी सोडवायचो, ही कोडी खूप किचकट असतात. ऑप्टिकल इल्युजन ऑनलाइन पाहायला मिळतात. यात अनेक प्रकार असतात कधी यात पक्षी शोधायचा असतो, कधी प्राणी तर कधी कधी तर चक्क चेहरे सुद्धा शोधायला सांगितलं जातं. ऑप्टिकल इल्युजन ऑनलाइन सोडवताना खूप मजा येते. याचं उत्तर लवकर शोधायचं असेल तर तुम्ही रोज एक तरी ऑप्टिकल इल्युजन सोडवायला हवं. रोज एक कोडे सोडवले की सरावाने तुम्हाला उत्तर शोधायला सोपं जातं.
हे थोडं हटके चित्र आहे. या चित्रात तुम्हाला वेगळं काय आहे ते शोधायचं आहे. ऑप्टिकल इल्युजनच्याच प्रकारात हा सुद्धा प्रकार मोडतो त्यात आपल्याला फरक शोधा, वेगळं काय आहे सांगा हे विचारलं जातं. या चित्रात किचन दिसून येतंय. इथे एक माणूस पेपर वाचत बसलाय आणि एक बाई फरशी पुसतीये. बघून हे दोघे नवरा बायको असल्यासारखं दिसून येतंय. य किचनमध्ये सगळं आहे. फ्रिज, मशीन, कपाट सगळं…या चित्रात तुम्हाला काहीतरी वेगळं दिसतंय का?
अशा प्रकारच्या चित्रांमध्ये उत्तर शोधायचं म्हणजे कसं शोधणार? आम्ही सांगतो, चित्र डावीकडून उजवीकडे बघा. वरून-खाली बघा. सगळ्या बाजूने चित्र जर नीट पाहिलं तर उत्तर नक्कीच सापडू शकतं. तुम्हाला यात काही वेगळं दिसलं का? जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन! जर उत्तर सापडलं नसेल तर आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत. ऑप्टिकल इल्युजनमुळे मेंदूचा चांगला व्यायाम होतो. या चित्रात फ्रिज दिसतोय का? नीट बघा, या चित्रात फ्रिजमध्ये झाडू ठेवलेले आहेत आणि हेच या ऑप्टिकल इल्युजनचं उत्तर आहे.