मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हे एक प्रकारचे कोडे असते. लहानपणी आपण ही कोडी तोंडी सोडवायचो, समोरचा आपल्याला तोंडी कोडी घालायचा आणि आपणही त्याचं उत्तर तोंडी द्यायचो. ऑप्टिकल इल्युजन हा प्रकार ऑनलाइन दिसून येतो. आता साहजिकच ऑनलाइन असल्यामुळे याला कसलं बंधन नाही उलट यात खूप प्रकार असतात. कधी यात एखादा पक्षी शोधायला सांगितला जातो, कधी प्राणी, कधी अंक, अक्षर, शब्द, तर कधी चक्क चित्रात लपलेले चेहरे शोधा असं सांगितलं जातं. हे चित्र इतके गोंधळून टाकणारे असतात की उत्तर आपल्या अगदी समोर असतं पण तरीही ते पटकन दिसत नाही. या प्रकारच्या चित्रांचं उत्तर शोधण्यासाठी निरीक्षण चांगलं लागतं. डोकं शांत ठेवा, मन एकाग्र करा आणि मग हे उत्तर शोधा.
हे चित्र बघा, यात तुम्हाला शहामृग शोधायचं आहे. या चित्रांमध्ये तुम्हाला बदक दिसतील. या बदकांमध्ये तुम्हाला शहामृग शोधायचं आहे. ऑप्टिकल भ्रम जर तुम्ही रोज सोडवलंत तर तुम्हाला याचं उत्तर सहज सापडू शकतं. हे चित्र बघून तुम्ही आधी गोंधळून जाल. शांत चित्ताने हे चित्र बघा या चित्रात तुम्हाला शहामृग नक्की सापडेल. लवकरात लवकर तुम्हाला याचं उत्तर शोधायचं आहे. जितक्या लवकर तुम्ही उत्तर शोधाल तितकं चांगलं. तुम्हाला शहामृग दिसलाय का?
आता तरी तुम्हाला याचं उत्तर सापडलंय का? आम्ही सांगतो याचं उत्तर कसं शोधतात. हे चित्र नीट बघा, प्रथमदर्शनी तुम्हाला याचं उत्तर दिसणार नाही. पण थांबा! एकदा हे चित्र डावीकडून-उजवीकडे बघा, वरून-खाली बघा. आता तुम्हाला शहामृग दिसलाय का? सगळ्यात आधी तर तुम्हाला शहामृग दिसायला कसं असतं हे माहिती असायला हवं. अशा चित्रांमध्ये जी गोष्ट शोधायची आहे ती दिसायला कशी आहे हे माहिती असायला हवं. तुम्हाला शहामृग दिसलाय का? जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन, नसेल सापडलं तर आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.