मुंबई: ऑप्टिकल इल्युजन सोडवण्यासाठी निरीक्षण कौशल्य चांगलं असायला हवं. लहानपणी आपण ही कोडी सोडवायचो, आपण ही कोडी तोंडी सोडवायचो आता आपण ही कोडी ऑनलाइन सोडवतो. ऑनलाइन कोड्यांना ऑप्टिकल इल्युजन म्हणतात. या चित्रांना भ्रम म्हटलं जातं. आपण सुरुवातील जेव्हा ही चित्रे बघतो तेव्हा आपण गोंधळून जातो. आपल्याला जे आधी या चित्रात दिसतं तेच सत्य असतं असं नसतं. या चित्रांमध्ये सत्य काहीतरी वेगळंच असतं. आता हे चित्र बघा, हे खूप व्हायरल होतंय. या चित्रात तुम्हाला पेन्सिल शोधायची आहे. आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल भ्रम पाहत आलोय. आपल्याला यात कधी फरक शोधायचा असतो. कधी चित्रात एखादी गोष्ट लपलेली असते ती शोधायची असते. याचं उत्तर शोधताना आपलं निरीक्षण चांगलं असायला हवं. ज्या व्यक्तीचं निरीक्षण चांगलं त्या व्यक्तीला याचं उत्तर लगेच मिळणार. ऑप्टिकल भ्रम ही खूप किचकट गोष्ट असते जी फक्त सरावाने सुटू शकते. रोज जर तुम्ही एक कोडं सोडवलं तर तुम्हाला हे नक्कीच सोपं जाणार.
हे चित्र बघा, यात तुम्हाला पुस्तकं दिसतील. यात पुस्तकांचा गठ्ठा आहे, या सगळ्या पुस्तकांमध्ये तुम्हाला पेन्सिल शोधायची आहे. हे एक भ्रम आहे. पहिल्यांदा हे चित्र बघून तुम्ही गोंधळून जाल. काळजी करू नका. डोकं शांत ठेवा, मन एकाग्र करा आणि काय प्रश्न आहे पुन्हा एकदा विचारा. तुम्हाला चित्रात काय शोधायचं आहे हे जर माहित असेल त्या दृष्टीने तुम्ही विचार करता. या चित्रात तुम्हाला पेन्सिल शोधायची आहे. तुम्हाला पेन्सिल दिसतेय का? जी गोष्ट तुम्हाला शोधायची आहे ती कशी दिसते माहित आहे ना? चला तर मग शोधा.
तुम्हाला याचं उत्तर सापडलं का? जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर तुम्ही हुशार आहात आणि तुमचं निरीक्षण कौशल्य चांगलं आहे. जर तुम्हाला उत्तर सापडलं नसेल तर, एक एक पुस्तक नीट बघा. खूप फास्ट आणि पटापट एक-एक पुस्तक बघा. तुम्हाला आता तरी पेन्सिल दिसलीये का? तुम्हाला जर याचं उत्तर दिसलं नसेल तर आम्ही याचं उत्तर खाली देतोय.