मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हे कोडे असते. हे कोडे आपण लहानपणी तोंडी सोडवायचो, आता ही कोडी आपण ऑनलाइन सोडवतो. ऑप्टिकल भ्रम खूप किचकट असतात. या चित्रात आपल्याला जे प्रथमदर्शनी दिसते तेच खरे असते असं नाही. सत्य काहीतरी वेगळेच असते, त्यामुळेच याला भ्रम असं म्हणतात. ऑप्टिकल इल्युजन सोडवण्यासाठी निरीक्षण कौशल्य चांगलं असायला हवं. ज्या लोकांचं निरीक्षण चांगलं त्या लोकांना याचं उत्तर लगेच सापडतं. मग काय याचं उत्तर शोधणं खरंच कठीण असतं का? नाही. जर तुम्ही रोज एक ऑप्टिकल इल्युजन सोडवलंत तर तुमचा सराव होईल. ऑप्टिकल इल्युजनमुळे मेंदूचा सराव होतो. या चित्रांमध्ये सुद्धा खूप प्रकार असतात. यात कधी आपल्याला लपलेली एखादी वस्तू शोधायची असते, कधी एखादं चुकीचं स्पेलिंग शोधायचं असतं तर कधी दुसरं काही शोधायचं असतं.
हे चित्र बघा, जंगलाचे चित्र तर सगळ्यात जास्त व्हायरल आहेत. या चित्रात झाडी आहेत, गवत आहे, घनदाट जंगल आहे. या चित्रात तुम्हाला वाघ शोधायचा आहे. वाघ शोधण्यासाठी तुमची नजर सुद्धा तशी तेज हवी. कमीत कमी वेळात तुम्हाला हा वाघ शोधायचा आहे. बरेचदा जंगलात काही शोधायला सांगितलं की ती वस्तू किंवा तो प्राणी त्याच रंगाचा असतो त्यामुळे तो पटकन कळून येत नाही. हे चित्र बघा यात तुम्हाला वाघ दिसलाय का?
आम्ही सांगतो यात वाघ कसा शोधायचा. या चित्रात डावीकडून उजवीकडे बघा, वरून खाली बघा. तुमच्या लक्षात आहे ना तुम्हाला यात काय शोधायचं आहे. जर तुम्हाला वाघ शोधायचा आहे तर साहजिकच तुम्हाला वाघ कसा दिसतो हे माहिती असायला हवं. जर तुम्हाला यात वाघ दिसला तर तुमच्या इतकं हुशार कुणीच नाही. जर तुम्हाला यात वाघ दिसला नसेल तर काळजी करू नका. आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.