मुंबई: लहानपणी आपण कोडी सोडवायचो, ही कोडी आपण तोंडी सोडवायचो. समोरचा आपल्याला तोंडी कोडी घालायचा आणि आपण त्याची तोंडी उत्तरं द्यायचो. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम. ऑप्टिकल भ्रम का म्हटलं जातं? या भ्रमात प्रथमदर्शनी जे दिसतं तेच खरं असतं असं नाही. यात सत्य काहीतरी वेगळंच असतं. ऑप्टिकल भ्रम हे गोंधळून टाकणारे असतात. पहिल्यांदा ऑप्टिकल भ्रम पाहिलं की माणूस गोंधळून जातो आणि मग पपुढे उत्तर शोधणं कठीण होऊन बसतं. ऑप्टिकल इज्युजन सध्या खूप व्हायरल होतायत. लोकांना ही कोडी सोडवताना खूप मजा येते. हे चित्र सोडवताना मेंदूचा व्यायाम होतो. यात अनेक प्रकार असतात. कधी आपल्याला यात लपलेला पक्षी शोधायचा असतो, कधी प्राणी, कधी कुठला शब्द तर कधी एखादं अक्षर! बरं पण तुम्हाला काय वाटतं हे इतकं सोपं असेल का? अजिबात नाही! ही चित्र म्हणजे तुमच्या निरीक्षण कौशल्याची परीक्षा असते.
ऑप्टिकल इल्युजन सारख्या किचकट चित्रांची उत्तरं कशी शोधायची? सोपं आहे. डोकं शांत ठेवायचं आणि मन एकाग्र करायचं, प्रश्न नीट आठवायचा आणि त्याचं उत्तर शोधायचं. आता या चित्रात तुम्हाला B हे अल्फाबेट शोधून दाखवायचं आहे. या चित्रात R हे अल्फाबेट आहे. जिथे बघेल तिथे आपल्याला R हेच अक्षर दिसतं. सुरुवातीला आपल्याला B हे अक्षर सापडतच नाही. पण मित्रांनो तुम्ही जर हे चित्र नीट निरखून पाहिलं तर तुम्हाला B नक्की दिसेल.
तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? आम्ही सांगतो याचं उत्तर कसं शोधायचं. हे चित्र एकदा डावीकडून उजवीकडे बघा, वरून खाली बघा. एक एक ओळ नीट निरखून बघा तुम्हाला याचं उत्तर नक्की दिसेल. आपल्याला जर प्रश्न लक्षात असेल तर उत्तर सापडणं देखील सोपं असतं. R दिसणाऱ्या या चित्रात B दिसणं तसं अवघड आहे पण एकाग्रतेने या चित्राकडे पाहिलं तर तसं सोपं आहे. अट फक्त एकच आहे ती म्हणजे फक्त सात सेकंदात तुम्हाला याचं उत्तर शोधायचं आहे. तुम्हाला याचं उत्तर दिसलंय का? जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन! नसेल सापडलं तर आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.