मुंबई: ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच कोडे, लहानपणी आपण तोंडी कोडी सोडवायचो. आता ही कोडी ऑनलाइन आलीयेत. या ऑनलाइन कोड्यांना आपण ऑप्टिकल इल्युजन, ऑप्टिकल भ्रम म्हणतो. भ्रम कशासाठी? आपण जेव्हा ही कोडी पहिल्यांदा बघतो तेव्हा आपल्याला या चित्रात जे पहिलं दिसतं, तेच खरं असतं असं नसतं. सत्य काहीतरी वेगळंच असतं. भ्रमात टाकणारं कोडं म्हणूनच याला ऑप्टिकल भ्रम म्हणतात. हे चित्र खूप किचकट असतात. ही चित्रे बघून आधी लोक गोंधळून जातात, उत्तर शोधण्यासाठी आधी डोकं शांत, मन एकाग्र करावं लागतं. निरीक्षण चांगलं असेल तर या कोड्यांची उत्तरे लगेच येतात.
आता हे चित्र बघा. या चित्रात तुम्हाला कोल्हा शोधायचा आहे. या चित्रात तुम्हाला जंगल दिसेल, सगळीकडे हिरवळ आहे पण कोल्हा दिसत नाही. नीट निरखून पहा कदाचित तुम्हाला याचं उत्तर सापडेल. आजवर आपण अनेक प्रकारचे कोडे पाहिले, हे जरा वेगळे आहे. कोडे सोडवताना तुमचं निरीक्षण चांगलं असायला हवं. जर ऑप्टिकल इल्युजन सोडवायचा तुम्हाला सराव असेल तर तुम्हाला याची उत्तरे कशी शोधायची याचाही सराव असणार. जरासं डोकं लावलं तर ही उत्तरे शोधणे तसं फारसं कठीण नाही.
तुम्हाला याचं उत्तर सापडलं का? आम्ही सांगतो या पद्धतीच्या कोड्यांची उत्तरे कशी शोधतात. हे चित्र नीट बघा, डावीकडून उजवीकडे सगळं नीट बघा. कोल्हा शोधायचा आहे तुमच्या लक्षात आहे ना? आपल्याला काय शोधायचं आहे आणि ते कसं दिसतं हे माहित असेल तर लगेच उत्तर दिसणार. कोल्हा कसा दिसतो माहितेय? आता त्याच आकृतीचं काहीसं ब्लर काही दिसून येतंय का तुम्हाला? डावीकडून उजवीकडे, वरून-खाली अशा पद्धतीने नीट बघा. या जंगलात कोल्हा कुठे हरवलाय? ज्या लोकांना याचं उत्तर दिसलं असेल ते खरंच हुशार आहेत आणि त्यांचं निरीक्षण कौशल्य चांगलं आहे. ज्यांना याचं उत्तर सापडलं नसेल त्यांना आम्ही खाली उत्तर दाखवून देत आहोत.