मुंबई: ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच एकप्रकारचे कोडे. हे कोडे सोडवताना आपलं निरीक्षण कौशल्य चांगलं असायला हवं. यात माणसाच्या हुशारीचा कस लागतो. ऑप्टिकल इल्युजन हे खूप गोंधळात टाकणारे असतात. तुम्हाला आठवतं का आपण लहाणपणी कोडी सोडवायचो?
हा ऑप्टिकल इल्युजनचा असाच काहीसा प्रकार आहे फक्त ही कोडी ऑनलाईन कोडी म्हणून ओळखली जातात. मन शांत करून एकाग्र चित्ताने याचं उत्तर शोधलं जाऊ शकतं. ज्या लोकांना कोड्याचं उत्तर लवकर सापडतं ते लोकं हुशार समजले जातात. आता हे चित्र नीट बघा, या चित्रात तुम्हाला इतक्या लोकांमध्ये भूत शोधायचं आहे.
तुम्हाला या चित्रात भूत दिसलंय का? भूत शोधायचं म्हणजे हे चित्र नीट बघा, या चित्रात लोकं दिसतील. जिथे एखादी व्यक्ती सामान्य माणसासारखी दिसणार नाही ते म्हणजे भूत. चला आता हे चित्र नीट निरखून बघा. सगळ्यात आधी तुम्ही कशाचं निरीक्षण कराल? हे चित्र बघताना माणसांना वरपासून ते खालपर्यंत व्यवस्थित बघा. डोक्याच्या केसांपासून ते पायांच्या नखापर्यंत सगळं नीट पाहिल्यावर एखादी तरी व्यक्ती यात नक्कीच असू शकते जिच्यात काहीतरी विचित्र असू शकतं, हो ना?
सोडवताना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते कोडं लवकरात लवकर सोडवणं. हे कोडे सुद्धा तुम्हाला असंच लवकरात लवकर सोडवायचं आहे. आता तरी तुम्हाला याचं उत्तर दिसलंय का? यात वेगळा असणारा माणूस, भूत दिसतंय का? आम्ही तुम्हाला हिंट देतो, एकदा या चित्रात असणाऱ्या सगळ्या व्यक्तींचे पाय बघा. एका महिलेचे पाय तुम्हाला वेगळे दिसले आहेत का? जरा नीट निरखून बघा. जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर ठीक, नसेल सापडलं तर आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.