मुंबई: ऑप्टिकल इल्युजनने मेंदूचा व्यायाम होतो. रोज एक ऑप्टिकल इल्युजन सोडवलं की मेंदूचा व्यायाम होतो, मेंदू फ्रेश होतो. ही चित्रे खूप किचकट असतात. या चित्रांमध्ये उत्तरे शोधणे खूप अवघड असतं. ऑप्टिकल भ्रमाची ही चित्रे खूप किचकट असतात. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी निरीक्षण चांगलं लागतं. पूर्वी तोंडी असायचं, एकजण समोरून तोंडी कोडे विचारायचा आणि मग हा खेळ खेळाला जायचा. आता हे सगळं ऑनलाइन आहे. ही चित्रे इंटरनेटवर व्हायरल होत असतात त्यात आपल्याला काहीतरी शोधायचं असतं. कधी या चित्रांमध्ये एखादी वस्तू शोधायला सांगितली जाते, कधी एखादं चुकीचं स्पेलिंग तर कधी दोन चित्रांमधील फरक. आता हे चित्र बघा…
या चित्रामध्ये तुम्हाला किवी शोधायची आहे. यात एक नाही तुम्हाला तीन किवी शोधायच्या आहेत. तुम्ही किवी शोधू शकता का? हे उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला किवी हे फळ कसं आहे ते माहिती असायला हवं. आता हे चित्र बघा, या चित्रात सगळ्या गोष्टी सारख्याच असल्याने किवी सापडणं थोडं अवघड आहे. चित्र बघितल्यावर डोळे फिरतात, माणूस गोंधळून जातो. पण डोकं शांत ठेवा, एकाग्र व्हा. किवी दिसतीये का?
आम्ही सांगतो याचं उत्तर कसं शोधायचं. वरून खाली, डावीकडून उजवीकडे एक-एक गोष्ट नीट बघा. जितक्या पटकन आणि एकाग्र होऊन तुम्ही हे बघाल तितक्या पटकन तुम्हाला याचं उत्तर सापडेल. यात एकूण ३ किवी आहेत. या किवी तुम्हाला शोधून काढायच्या आहेत. जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन! जर तुम्हाला याचं उत्तर दिसलं नसेल तर आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.