ऑप्टिकल इल्यूजनचा एक अतिशय सुंदर फोटो समोर आला आहे. आता ऑप्टिकल भ्रम तुमच्यासाठी नवीन नाही आम्ही ते रोजच शेअर करतो. अशा चित्रांमुळे आपण जे पाहतो ते सत्य आहे, असा विश्वास आपल्याला वाटतो पण असं मुळीच नसतं. निरीक्षण कौशल्य उत्तम असेल आणि बुद्धी चौकस असेल तर तुम्हाला ही कोडी सोडवायला सोपी जातात.
प्रत्यक्षात या चित्रात एक जोडपं समोर दिसतंय, ते जंगलात छान मस्त फिरतंय. त्यांच्या आजूबाजूला काही प्राणी-पक्षी दिसतात. या जोडप्यासोबत त्यांचा पाळीव कुत्रा, तसेच वर एका झाडावर बसलेले घुबडही दिसत आहेत. दरम्यान, तिथे एक ससाही आहे. चित्रात हा ससा शोधून तो कुठे आहे ते सांगावे.
या चित्राची गंमत म्हणजे हा ससा अजिबात दिसत नाही. या जोडप्याजवळ असणारी झाडेही दिसतायत. पण या सगळ्या गोष्टींच्या मध्येच त्यात एक ससा आहे आणि कोडे नेमके तेच आहे की आपल्याला तो ससा शोधायचाय…
या चित्रात हा ससा एका पडक्या झाडाजवळ बसलेला असतो. नीट पाहिलं तर डाव्या बाजूला पडलेल्या झाडाच्या दोन खोडांमध्ये हा ससा बसलेला असतो. ससा आणि झाडाच्या खोडाचा कलर सेम टू सेम आहे त्यामुळे त्याला शोधताना अडचण येते.
पण नीट निरखून पाहिल्यावर ससा कुठे आहे, हे कळते. तुमच्या सोयीसाठी आम्ही तुम्हाला खाली दाखवतो ससा नेमका आहे कुठे.