मुंबई: ऑप्टिकल इल्युजन खूप किचकट असतं. या प्रकारचे कोडे आपण लहानपणी सोडवायचो. ही कोडी पूर्वी तोंडी सोडवली जायची, आता ही कोडी ऑनलाइन असतात. ऑप्टिकल इल्युजन हा कोड्याचा प्रकार ऑनलाइनच असतो. यात अनेक प्रकार असतात. कधी यात आपल्याला अंक शोधावे लागतात, कधी शब्द, कधी प्राणी, कधी पक्षी तर कधी यात चेहरे शोधावे लागतात. ऑप्टिकल भ्रम पहिल्यांदा पाहिलं की माणूस गोंधळून जातो, या चित्रांची खासियतच ती असते. हे चित्र बघून सुद्धा तुम्ही आधी गोंधळून जाल पण डोकं शांत आणि मन एकाग्र करून यात उत्तर शोधा. तुम्हाला याचं उत्तर शोधायचं असेल तर तुम्ही सुद्धा डोकं शांत ठेऊन विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधा.
हे चित्र बघा, या चित्रात भोपळे दिसतील. यात नाक नसलेला भोपळा शोधा. चित्रात दिसणारे भोपळे कार्टून स्केच मधील भोपळे वाटतील. या भोपळ्यांना नाक आहे, डोळे आहेत. हे भोपळे छान हसतायत. या चित्रात नाक नसलेला भोपळा शोधायचा आहे. हे चित्र बघून सुरुवातीला तुम्ही गोंधळून जाल. पण शांत चित्ताने जर तुम्ही यात नाक नसलेला भोपळा शोधलात तर तो नक्की सापडेल. या पद्धतीच्या चित्रांमध्ये उत्तर कसं शोधायचं ते जाणून घेऊया…
या चित्रात डावीकडून उजवीकडे बघा, वरून-खाली नीट बघा आता तुम्हाला नाक नसलेला भोपळा दिसलाय का? गोंधळात टाकणारं हे चित्र नीट निरखून बघा. आता तुम्हाला हा भोपळा सापडलाय का? एक-एक भोपळा नीट बघा यात तुम्हाला उत्तर नक्की सापडेल. ऑप्टिकल भ्रमात प्रथमदर्शनी जे दिसतं तेच सत्य असतं असं नाही, सत्य काहीतरी वेगळंच असतं. तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन, नसेल सापडलं तर आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.