ऑप्टिकल भ्रमांची खासियत म्हणजे त्यांच्याशी संबंधित चित्रे आपली फसवणूक करतात. अशा चित्रांमुळे आपण जे पाहतो ते सत्य आहे, असा विश्वासही वाटतो, तर तसे मुळीच नाही. असेच एक चित्र समोर आले आहे, ज्यामध्ये एक साप लपलेला आहे. तो साप कुठे आहे हे शोधावे लागेल.
जिराफांच्या या गर्दीत खतरनाक सापही हजर आहे. चित्रात हा साप कुठे आहे, हे शोधून सांगा. ऑप्टिकल भ्रमाचे हे चित्र गोंधळून टाकणारं आहे.
इतकेच नव्हे तर एखाद्या चित्राबद्दल बोलताना आपला मेंदू कसा काम करतो हे समजण्यासही ऑप्टिकल इल्युजन शास्त्रज्ञांना नेहमी मदत करतात.
या चित्राची गंमत म्हणजे हा साप अजिबात दिसत नाही. चित्रात अनेक जिराफ लोंबकळत असून त्यांची फक्त मान दिसत असल्याचं दिसतं.
पण सर्व जिराफांमध्ये त्यात साप लवकर दिसत नाही. पण जर तुम्हाला हा साप सापडला तर तुम्हाला प्रतिभावंत म्हटले जाईल.
खरं तर या चित्रात हा साप वरपासून खालपर्यंत लोंबकळत आहे. तुमच्या हाताच्या उजव्या बाजूला वर बघा. उजवीकडून डावीकडे जिराफ मोजत या… यात पाचव्या जिराफानंतर जे दिसते तो म्हणजे साप. दिसला?
सत्य हे आहे की साप हुबेहूब जिराफासारखा दिसतो. नीट निरखून पाहिले तर तो साप कुठे आहे हे कळते.