चित्र पाहिल्यानंतर तुम्हीही गोंधळलात का? जर असे असेल तर तुम्हाला निरीक्षण कौशल्य वाढवण्याची गरज आहे. सोशल मीडियावर असे अनेक फोटो आहेत, जे पाहून तुम्ही थक्क व्हाल. ऑप्टिकल इल्युजन तुम्हाला तुमच्या निरीक्षण कौशल्याबद्दल, तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल माहिती देतात. डोळ्यांची फसवणूक होणे किंवा समोर पडलेली गोष्ट सहजपणे न दिसणे ही ऑप्टिकल भ्रमची वैशिष्ट्ये सोडवताना अशावेळी तुम्ही तुमच्या कामात कुशल तर व्हालच, पण लोकांची परीक्षाही घेऊ शकता. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक नंबर शोधावा लागणार आहे. मात्र हा नंबर तुम्हाला सहजासहजी दिसणार नाही.
नंबर शोधण्यासाठी चित्रावर नजर ठेवून तो नंबर कुठे आहे हे पाहावं लागेल. वरील फोटो व्हिज्युअल टेस्ट म्हणून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. ‘तुम्हाला कोणता नंबर दिसतो?’ असा प्रश्न विचारत हा फोटो पोस्ट करण्यात आलाय. या ऑप्टिकल इल्यूजन इमेजमध्ये काळ्या-पांढऱ्या पार्श्वभूमीचे एक वर्तुळ दाखवण्यात आले आहे, ज्यात वर्तुळाच्या आत आकडे लपलेले आहेत.
हा ऑप्टिकल भ्रम आपल्या दृष्टीची चाचणी करण्याचा एक मजेदार मार्ग आहे. चित्रात जे काही आकडे दिसतात, ते शोधण्याचा प्रयत्न करा. जर आपल्याला असे वाटत असेल की आपली दृष्टी खराब होत आहे तर मदत घ्या. या ऑप्टिकल भ्रमात लोकांना तीन संख्यांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन दिसतात. याचे अचूक उत्तर ‘786’ असे आहे.
सोशल मीडियावरील प्रतिक्रियांनुसार, लोकांनी हा आकडा 786, काहींना 780 तर काहींनी 700 म्हणून ओळखला. जर आपण ऑप्टिकल भ्रम चित्राचा कॉन्ट्रास्ट वाढविला आणि तो थोडा अधिक धूसर केला तर आपण योग्य संख्या ओळखू शकाल.