मुंबई: हे निवडक पिक्चर पझल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रथमदर्शनी तुम्हाला एक असा आकार दिसेल, ज्यात काळ्या-पांढऱ्या रंगात फुले आणि पाने आहेत. आता अवघ्या 10 सेकंदात लपलेला प्राणी शोधण्याचे आव्हान तुमच्यासमोर आहे. खरं तर हा प्राणीही याच आकारात मिसळला आहे. असा दावा केला जात आहे की सर्वात मोठ्या प्रतिभावंताला सुद्धा चित्रातील फरक शोधण्यासाठी एका मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला, परंतु त्याला तो मिळाला नाही. इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा फोटो पाहिल्यानंतर अनेक जणांनी खूप प्रयत्न केले.
असे म्हणतात की ज्यांचे डोळे तीक्ष्ण असतात ते काही सेकंदात ऑप्टिकल भ्रम सोडवतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो जपानी पिक्चर्स पझल युट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. या चित्रात एक लपलेला प्राणी आहे जो शोधणे खूप कठीण आहे. गरुडासारखे डोळे असतील किंवा तुम्ही जर अतिबुद्धिमान असाल तर हे उत्तर शोधणे तुमच्यासाठी कठीण नाही. कोडी सोडवायची सवय असल्यास तर तुम्हाला अगदीच कमी वेळ सुद्धा लागू शकतो.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये तुम्हाला एक सारडा सापडेल जो पूर्णपणे त्या नक्षीकामात मिसळला आहे. चित्राचा खालचा भाग बघा. जर तुम्हाला अजूनही ते सापडत नसेल तर आम्ही तुम्हाला चित्राच्या माध्यमातून उपाय सांगणार आहोत. असे अनेक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत आणि लोक अजूनही ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.