मुंबई: ऑप्टिकल इल्युजन म्हणजे कोडे. आपण लहाणपणी कोडी सोडवायचो हीच कोडी आता ऑनलाइन बघायला मिळतात. कधी या कोड्यांमध्ये आपल्याला एखादी वस्तू शोधायची असते तर कधी चुकलेलं एखादं स्पेलिंग. लहानपणी जेव्हा आपण ही कोडी सोडवायचो तेव्हा आपण ते एखाद्या स्पर्धेप्रमाणे घ्यायचो. भावंडांमध्ये स्पर्धा लागायची. आता पूर्वीप्रमाणे गेट टु गेदर तर होत नाहीत पण ही कोडी सोडवायची स्पर्धा मात्र लोकं ऑनलाइनच करतात.
ऑप्टिकल इल्युजन बद्दल एक खास गोष्ट म्हणजे शास्त्रज्ञ म्हणतात की अशी चित्रे व्यक्तीचे व्यक्तीमत्त्व ओळखण्यासाठी वापरले जातात. ऑप्टिकल इल्युजनच्या सहाय्याने माणसाचं व्यक्तीमत्त्व ओळखलं जातं. समजा एखादं चित्र तुम्हाला दाखवलं गेलं तर तुम्हाला विचारलं जातं की यात तुम्हाला आधी काय दिसतंय. अनेकदा किचकट चित्र देऊन त्यात काहीतरी शोधायला सांगितलं जातं जेणेकरून तुमचं निरीक्षण कौशल्य कसं आहे हे बघता येईल.
आता हे चित्र बघा. या चित्रात तुम्हाला शोधायची आहे बॅले डान्सर. ही बॅले डान्सर या झाडांमध्येच कुठेतरी लपलेली आहे. सगळ्यात आधी दिसताना तुम्हाला झाडे, गवत दिसतील, एखाद्या टेकडी सारखं ठिकाण दिसेल पण नीट जर निरखून पाहिलं तर त्यात लपलेली बॅले डान्सर दिसेल. ज्या व्यक्तीला ही डान्सर दिसेल ती व्यक्ती खरोखरंच हुशार आहे. तुम्हाला ही बॅले डान्सर दिसली का? नसेल दिसली तर हरकत नाही आम्ही खाली याचं उत्तर देत आहोत.