मुंबई: लहानपणी आपण कोडी सोडवायचो. ही कोडी सोडवायला आपल्याला खूप मजा यायची. सुट्टीला आजोळी गेलं की एक ठरलेला कार्यक्रम असायचा, सगळी भावंडं गोळा झाली की कोड्यांची चढाओढ लागायची. एक जण कोडी सांगणार दुसरा ती सोडवणार. जो ते कोडं पटकन सोडवून दाखवेल तो सगळ्यात हुशार ठरायचा. जसजसा काळ पुढे सरकला कोड्यांचं स्वरूप बदललं. आता हीच कोडी ऑनलाइन आलीत. या कोड्यांना आता ऑप्टिकल इल्युजन म्हणतात. ऑप्टिकल इल्युजन हा एक प्रकारचा मेंदूचा व्यायाम आहे. ही कोडी इंटरनेट वर इतकी फेमस आहेत की लोकं रिकाम्या वेळेत ही कोडी सोडवत बसतात.
ऑप्टिकल इल्युजन मध्ये वेगवेगळे प्रकार असतात. अशा चित्रांमध्ये काय लपलंय हे शोधायचं असतं, कधी यात एखादा चुकीचा शब्द शोधायचा असतो तर कधी यात आपल्याला सर्वात आधी काय दिसतंय हे सांगायचं असतं. हे ऑनलाइन कोडे सोडवताना खूप कस लागतो. निरीक्षण कौशल्य चांगली असणारी व्यक्ती अशा प्रकारची कोडी सहज सोडवू शकते. आता हेच चित्र नीट पहा…या चित्रातला फरक तुम्हाला सांगायचा आहे. इथे एक ब्रेकफास्टची प्लेट ठेवली आहे. यात काय फरक आहे हे तुम्हाला सांगायचं आहे.
15 सेकंदात तुम्हाला या दोन चित्रांमधील फरक सांगायचा आहे. या चित्रात एक प्लेट आहे ज्यात पॅनकेक, अंडी, बेरीज, ब्लॅक कॉफी, संत्री असं सगळं ठेवलंय. या दोन्ही प्लेट मध्ये याच गोष्टी आहेत अगदी हुबेहूब… पण या दोन्हीमध्ये फरक आहे. हाच फरक तुम्हाला 15 सेकंदात शोधून दाखवायचा आहे.
आम्ही हे फरक चित्रात गोल करून दाखवत आहोत. तुम्हाला याचं उत्तर मिळालं असेल तर उत्तम. नसेल मिळालं तर खालील चित्र एकदा नजरेखालून घाला.