मुंबई: बर्फाळ प्रदेशातील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा फोटो ऑप्टिकल भ्रम असणारा फोटो आहे. ऑप्टिकल भ्रम आपल्या मेंदूला चालना देतात. यात तुमच्या निरीक्षण कौशल्याची चाचणी घेतली जाते. ऑप्टिकल भ्रम म्हणजे एक प्रकारचे कोडे असते. आपण लहानपणी तोंडी कोडी सोडवायचो. जो सगळ्यात आधी कोड्याचं उत्तर देईल तो हुशार ठरायचा. कोडी सोडवा ही एक प्रकारची स्पर्धाच असायची. आता हीच कोडी ऑनलाइन आलीयेत. दिलेल्या वेळेत ही कोडी सोडवायची असतात.
ऑप्टिकल भ्रम म्हणजेच ऑप्टिकल इल्युजन, यात कधी तुम्हाला एखादी वस्तू शोधून दाखवायची असते तर कधी प्राणी शोधायचो असतो. कधी कधी या फोटोंवरून तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे हे देखील कळतं. म्हणजे समजा एखादा फोटो असेल तर त्यात तुम्हाला आधी काय दिसतं यावर सगळं असेल. चित्रात जे आधी असेल त्यावरून तुमचं व्यक्तिमत्त्व ठरेल. ही बाब संशोधनातून समोर आलीय. या चित्रात प्रथमदर्शनी जे दिसतं तेच खरं असतं असं आपल्याला वाटतं पण हा एक प्रकारचा भ्रम असतो आणि म्हणूनच याला ऑप्टिकल भ्रम म्हणतात. आता हाच व्हायरल होणार फोटो बघा.
हा फोटो बर्फाळ प्रदेशातला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला कुत्रा शोधून दाखवायचा आहे. हा फोटो किचकट आहे. यात लगेच कुत्रा दिसत नाही. पण नीट निरखून पाहिलं तर कुत्रा दिसतो. आता खरी कसोटी ही आहे की फक्त ५ सेकंदात तुम्हाला हा कुत्रा शोधून दाखवायचा आहे. हे चित्र नीट पहा, तुम्हाला हा कुत्रा दिसतोय का? आम्ही तुम्हाला हिंट देतो. हा फोटो बर्फाळ प्रदेशातला आहे, कुत्रा पांढऱ्या रंगात आहे का? नीट बघा. तुम्हाला जर याचं उत्तर सापडलं असेल तर ठीक. नसेल सापडलं तर आम्ही याचं उत्तर खाली दाखवून देतोय.