मुंबई: ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच कोडे. आपण लहानपणी तोंडी कोडी सोडवायचो, आता ही कोडी ऑनलाइन आलीयेत. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम. भ्रम कशासाठी? आपण जेव्हा या प्रकारची चित्रे बघतो, आधी गोंधळून जातो. आपल्याला या जे दिसेल तेच सत्य असतं असं नसतं, सत्य काहीतरी वेगळंच असतं आणि म्हणूनच याला भ्रम म्हणतात. हे चित्र बघून सुरवातीला आपला इतका गोंधळ उडतो. याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला डोकं शांत ठेवावं लागतं, मन एकाग्र करावं लागतं. विशेष म्हणजे हे उत्तर आपल्याला कमीत कमी वेळात शोधायचं असतं. कधी यात आपल्याला लपलेली वस्तू शोधायची असते तर कधी चुकीचा शब्द शोधायचा असतो. अभ्यासक तर असंही म्हणतात की ऑप्टिकल इल्युजनमुळे माणसाचं व्यक्तिमत्त्व कळून येतं.
आता हे चित्र बघा, या चित्रात तुम्हाला फूल शोधायचं आहे. हे चित्र इतकं किचकट आहे. पटकन यात आपल्याला फूल दिसत नाही. हे चित्र एका घराचं आहे. आपल्याला यात आरसा, डायनिंग टेबल, टेबल, लॅम्प आहे. डायनिंग टेबलवर एक बास्केट सुद्धा आहे. पुस्तकं ठेवलेली आहेत. पण कोडं असं आहे की तुम्हाला यात एक फूल शोधायचं आहे. इतक्या सगळ्या गर्दीत आपल्याला काहीच दिसत नाही. हे फूल कोणत्या रंगाचं आहे आणि कुठलं आहे असं काहीही यात सांगितलं गेलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला अंदाजे हे शोधावं लागणारे. जर तुम्ही गुलाबाचं फूल म्हणून शोधायला गेलात तर तसं याचं उत्तर सापडणार नाही.
तुम्हाला याचं उत्तर दिसलं आहे का? या चित्रात तुम्हाला फूल शोधायचं आहे. तुमचं निरीक्षण चांगलं असेल तर तुम्हाला याचं उत्तर सापडलंच असेल. आम्ही सांगतो याचं उत्तर कसं शोधायचं. या चित्रातील एक एक वस्तू, एक-एक गोष्ट नीट बघा, यातल्या एका तरी वस्तूच्या आसपास तुम्हाला फूल दिसेल. तुम्हाला याचं उत्तर दिसलं आहे का? जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं नसेल तर आम्ही तुम्हाला याचं उत्तर खाली देत आहोत. प्रत्येक गोष्ट जर बारकाईने पाहिली तर याचं उत्तर नक्की दिसेल.