मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हा एक प्रकारचा मेंदूचा व्यायाम आहे. यात कधी एखादी गोष्ट शोधायची असते, तर कधी चित्रांमधील फरक शोधायचा असतो. कधी कधी तर यावरून आपलं व्यक्तिमत्त्व सुद्धा कळून येतं. चित्रात आपल्याला आधी काय दिसतं यावर आपलं व्यक्तिमत्त्व अवलंबून असतं. शास्त्रज्ञ सांगतात की ज्याला आपलं निरीक्षण कौशल्य चांगलं करायचं असेल त्याने ऑप्टिकल भ्रमाचा आधार घ्यावा. या चित्राची खासियत म्हणजे यात तुम्हाला जे काही शोधायचं असतं ते एका ठराविक वेळेत शोधायचं असतं. याने तुम्हाला वेग येतो.
हे चित्र म्हणजे लोकांच्या मेंदूला आव्हान देणारे असते. निरीक्षण कौशल्याची परीक्षा घेणारे हे चित्र असते. ऑप्टिकल भ्रमाचे सौंदर्य हे आहे की ते कमी काळासाठी वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेते आणि मेंदूची चांगली कसरत आहे. या चित्रात झाडे आणि ढग दिसतायत आणि त्यापैकी एक जिराफ शोधायचा आहे. या फोटोची गंमत म्हणजे हा जिराफ अजिबात दिसत नाही. या फोटोत झाडाच्या वर ढग दिसत आहेत. सूर्याचा लालसरपणाही दिसतोय. या सगळ्यात जिराफ दिसत नाही. या चित्राचे उत्तर केवळ एक टक्के लोकांनाच देता आले आहे.
या फोटोमध्ये हा जिराफ एका झाडाजवळ उभा असून फक्त त्याची मान दिसत आहे. नीट पाहिलं तर मधलं झाड आणि सूर्य यांच्यामध्ये जो आकार दिसतो तो म्हणजे जिराफ. मुळातच हे कोडे असल्यामुळे हे चित्र मुद्दाम गोंधळ घालून देणारे आहे. नीट पाहिल्यावर जिराफ कुठे आहे हे कळते. तुम्हाला हे उत्तर सापडलं आहे का? नसेल सापडलं तर आम्ही तुम्हाला खाली उत्तर दाखवत आहोत.