Optical Illusion: या चित्रात मोबाईल फोन शोधून दाखवा!

| Updated on: May 13, 2023 | 10:43 AM

अनेकांनी या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं, पण अजूनही काही लोकांना मोबाईल सापडलेला नाही. या फोटोची सर्वात खास गोष्ट म्हणजे यात रोज वापरल्या जाणाऱ्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.

Optical Illusion: या चित्रात मोबाईल फोन शोधून दाखवा!
Find the mobile phone
Follow us on

मुंबई: ऑप्टिकल इल्युजनचे आणखी एक उत्तम चित्र नुकतेच समोर आले आहे. ज्यामध्ये एक मोबाईल लपवण्यात आला आहे. ज्यांना हा मोबाईल फोन सापडतो ते इतके स्मार्ट असू शकतात की त्यांचे डोळे गरुडापेक्षा वेगवान मानले जाऊ शकतात. या चित्रात अशा अनेक गोष्टी दिसत आहेत ज्या दैनंदिन जीवनात वापरल्या जातात. यात घड्याळे आणि स्मार्टफोनचाही समावेश आहे. या चित्रात मोबाईल लपवून ठेवण्यात आला आहे. खरं तर नुकताच हा फोटो सोशल मीडियावर समोर आला होता, त्यामुळे काही युजर्सनी ओपन चॅलेंज दिलं होतं. अनेकांनी या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं, पण अजूनही काही लोकांना मोबाईल सापडलेला नाही. या फोटोची सर्वात खास गोष्ट म्हणजे यात रोज वापरल्या जाणाऱ्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.

यात पुस्तके आणि घड्याळांपासून ते कॅल्क्युलेटरपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. या सर्व वस्तू अत्यंत सरळ आणि साध्या आकारात तयार करण्यात आल्या आहेत. एक विशेष गोष्ट म्हणजे खरी गोष्ट पकडली जाऊ नये म्हणून त्यांना एकमेकांच्या खूप जवळ दाखवण्यात आले आहे.

याचं उत्तर तुम्हाला अद्याप सापडलेलं नसेल तर चित्र नीट बघा, डाव्या बाजूने दिसणाऱ्या पहिल्या घड्याळाच्या अगदी खाली मोबाईल फोन दिसत आहे. हा मोबाईल फोन अशा प्रकारे बनवण्यात आला होता की तो दिसत नाही. पण सध्या तरी याचे उत्तर सापडले आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर असाच आणखी एक फोटो समोर आला होता ज्यात मोबाईल फोनशिवाय दुसरं काहीतरी शोधायचं होतं. त्या वेळचे चित्रही लोकांसाठी कोडेच बनले. सध्या हे नवे चित्र समोर आले आहे.

Here is the mobile