Optical Illusion | हे कोडे सोडावा! या चित्रात मेंढी शोधून दाखवा

| Updated on: Aug 30, 2023 | 3:56 PM

हे कोडे बघा. आज हे कोडे व्हायरल आहे. जर तुमचं निरीक्षण चांगलं असेल तर तुम्हाला या कोड्याचं उत्तर खूप पटकन सापडेल. ऑप्टिकल इल्युजन हे खूप गोंधळून टाकणारे असते. पण हे सोडवायला घेतले की मेंदू एकदम फ्रेश होतो.

Optical Illusion | हे कोडे सोडावा! या चित्रात मेंढी शोधून दाखवा
spot the sheep in this picture
Follow us on

मुंबई: ऑप्टिकल इल्युजन सोडवायचा जर सराव असेल तर ते पटकन सोडवता येतं. विशेष म्हणजे दिलेल्या वेळात या कोड्याचं उत्तर शोधायचं असतं. कधी या चित्रांमध्ये चुकीचं काही असेल तर शोधायचं असतं, कधी यात काही लपलेलं असतं ते शोधायचं असतं. ऑप्टिकल इल्युजन मुळे मेंदूचा व्यायाम होतो. मेंदू फ्रेश होतो. ऑप्टिकल इल्युजन सध्या खूप ट्रेंडिंग असतं. लोकांनाही हे सोडवायला खूप आवडतं. यात लोकांच्या निरीक्षण कौशल्याचा कस लागतो. जितक्या लवकर उत्तर सापडेल तितकं एखाद्याचं निरीक्षण चांगलं.

मेंढी शोधा

शास्त्रज्ञांचं सांगतात की ऑप्टिकल इल्युजन मुळे लोकांचं व्यक्तिमत्त्व कसं आहे ते समजतं. यात बरेचदा तुम्हाला आधी काय दिसतं यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. चित्र पाहिल्या पाहिल्याच मेंदू गोंधळून जातो, डोळे फिरतात. हा फोटो बघा, हा ढंगाचा फोटो आहे. यात तुम्हाला एक मेंढी शोधायची आहे. आता तुम्हाला हे चित्र बघून आधी काहीच स्पष्ट दिसणार नाही, तुम्हाला सगळे ढगच दिसतील. पण या सगळ्या ढगांच्या गर्दीमध्ये एक मेंढी लपलेली आहे. ही मेंढी तुम्हाला पटकन शोधून दाखवायची आहे.

तुम्हाला हे उत्तर सापडलं आहे का?

तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडलं का? हे चित्र बघा यात पतंग दिसेल, ढग दिसेल, आकाश दिसेल. पण कोडे हे आहे की यात तुम्हाला मेंढी शोधायची आहे. आता असं का आहे हे कोडं? हे मुळातच ढगांचं चित्र असल्यामुळे यात मेंढी शोधणं खूप कठीण आहे. यात तुम्हाला सगळ्या बाजूने नीट पाहायचं आहे. एकदम बारीक बघितल्या नंतर तुम्हाला कदाचित यात मेंढी दिसेल. जर समजा तुम्हाला यात मेंढी सापडली तर समजा की तुम्ही जिनिअस आहात. तुम्हाला हे उत्तर सापडलं आहे का? सापडलं असेल तर ठीक, नसेल सापडलं तर आम्ही तुम्हाला याचं उत्तर खाली दाखवत आहोत.

here is the sheep