मुंबई: हे चित्र बघा हे एक कोडे आहे. ऑप्टिकल भ्रम सोडवणे खूप कठीण असते. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम. हे सोडवताना माणूस खूप गोंधळून जातो. आता या चित्रात तुम्हाला केळी दिसेल. या केळ्यांमध्ये तुम्हाला साप शोधायचा आहे. आधी जेव्हा आपण हे चित्र बघतो तेव्हा आपल्याला केळी दिसतात. पण यात आपल्याला साप शोधायचं चॅलेंज दिलेलं आहे. ही चित्रे गोंधळून टाकणारी असतात. पण यासाठी एक ट्रिक असते. सगळ्या बाजूने हे चित्र नीट पाहिलं की याचं उत्तर सापडतं. विशेष म्हणजे या कोड्याचं उत्तर तुम्हाला कमीत कमी वेळात शोधायचं असतं.
आता या दिलेल्या चित्रात तुम्हाला साप शोधायचा आहे. केळी असणाऱ्या चित्रात साप शोधणं का कठीण जातंय? कारण साप सुध्दा पिवळा आणि केळी सुध्दा पिवळी…एकच रंग असल्यामुळे हा साप शोधणे आहे कठीण. पण हेच खरे कोडे आहे. तुमचं निरीक्षण जर चांगलं असेल तर तुम्हाला याचं उत्तर शोधणं सोपं जाईल. उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे हे चित्र नीट बघा, बारकाईने पाहिल्यास या चित्रात तुम्हाला साप दिसेल.
मोजून 10 सेकंदात तुम्हाला याचं उत्तर शोधायचं आहे. तुमच्या माहितीसाठी, साप सुद्धा पिवळ्याच रंगाचा आहे. तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? तुम्हाला यात पिवळ्या रंगाचा साप दिसलाय का? आपण आजवर वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन पाहिले आहेत. सध्या अशा प्रकारची कोडी ट्रेंडिंग सुद्धा आहेत. जर तुम्ही डोकं शांत करून, मन एकाग्र करून या चित्रात साप शोधला तर तुम्हाला सहज हा साप दिसेल. माणसाच्या मेंदूची परीक्षा घेणे, मेंदूचा व्यायाम होणे, मन एकाग्र करता येणे हाच ऑप्टिकल इल्युजनचा हेतू असतो. खालचे चित्र बघा, यात आम्ही उत्तर दाखवत आहोत.