मुंबई: इंटरनेटवर दररोज शेकडो फोटो व्हायरल होतात. यातील काही पाहून आपण प्रचंड गोंधळून जातो. अशा प्रतिमांना ऑप्टिकल भ्रम म्हणतात. ते केवळ आपले निरीक्षण कौशल्य सुधारत नाहीत तर आपल्या मेंदूचा व्यायाम देखील करतात. खरं तर चित्रांमध्ये काहीतरी दडलेलं असतं आणि ते शोधण्याचं काम आपल्यावर सोपवलं जातं. सध्या असेच एक चित्र चांगलेच चर्चेत आहे, ज्यामध्ये लपलेल्या सापाचा शोध घेण्याचे काम लोकांना देण्यात आले आहे.
ऑप्टिकल भ्रम ठराविक वेळेत सोडवायचा असेल तर लक्ष देऊन कोडे सोडवावं लागतं. कारण, साध्या डोळ्यांनी ऑप्टिकल भ्रम असलेले चित्र आपल्याला काय दाखवू इच्छिते तेच दिसेल. असंही म्हटलं जातं की, ज्यांचा डोळा अतिशय तीक्ष्ण असतो, त्यांच्यासाठी त्याचं गूढ सोडवणं सोपं असतं. बघू या तुमची दृष्टी किती तीक्ष्ण आहे.
वरील फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती घराबाहेर बसली आहे. पण त्याला कल्पनाच नाही कि त्याचा मृत्यू जवळ येत आहे. त्याच्या आजूबाजूला कुठेतरी एक विषारी साप आहे, जो त्याचा जीव घेऊ शकतो. आता तुम्हीच या माणसाला मरण्यापासून वाचवू शकता. आजच्या ऑप्टिकल इल्युजन टास्कमध्ये साप कुठे आहे हे सांगावे लागेल. पण त्यासाठी फक्त ७ सेकंदाचा अवधी आहे.आता उशीर करू नका. कारण तुमची वेळ सुरू झाली आहे.
आता सांगा, साप पाहिला का? उत्तर होय असेल तर खूप खूप अभिनंदन. नसलं तरी फरक पडत नाही. कदाचित आपण ऑप्टिकल भ्रमांच्या खेळात थोडे कच्चे आहात. पण काळजी करू नका. खालील चित्रात आपण तो साप कुठे आहे हे सांगितले आहे.