मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हे एक प्रकारचे कोडे आहे. ही कोडी एक प्रकारची ऑनलाइन कोडी असतात. लहानपणी आपण तोंडी कोडी सोडवायचो आता आपण तीच कोडी ऑनलाइन सोडवतोय. यालाच आपण ऑप्टिकल इल्युजन म्हणतो. गेल्या काही वर्षांचा डेटा पाहिला तर लक्षात येईल की, गेल्या काही वर्षांत ऑप्टिकल इल्युजनची क्रेझ प्रचंड वाढली आहे. ऑप्टिकल इल्युजनमुळे माणसाचा आयक्यू वाढतो. आपलं निरीक्षण कौशल्ये देखील सुधारतात. असेच एक कोडे सध्या चर्चेत आहे.
तुम्हाला ऑप्टिकल इल्युजन किंवा ब्रेन टीझरचा नक्कीच सामना करावा लागला आहे. त्यांची रचना किंवा निर्मिती अशा प्रकारे केलेली असते की, ते पाहताच समोरची व्यक्ती गोंधळात पडते. हे चित्र बघा जिथे एक कासव लपलेलं आहे पण ते कोणालाच दिसत नाही.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये विटांनी बनवलेला एक रस्ता आहे, पण त्यात एक कासव दडलेलं आहे. होय, आपल्याकडे ते शोधण्यासाठी पूर्ण दिवस नाही, परंतु केवळ दहा सेकंद आहेत. जर तुम्ही हे काम ठरलेल्या वेळेत पूर्ण केले तर तुमचं निरीक्षण चांगलं आहे.
आम्हाला आशा आहे की आपण काही वेळातच कासव शोधून काढले असेल. जर तुम्हाला 10 सेकंदात कासव सापडले असेल तर मुकाबारक हो या चॅलेंजचा विजेता ठरला आहे. बाय द वे, ज्यांना ते सापडलं नाही त्यांच्यासाठी आम्ही वर एक फोटो शेअर केला आहे. जेणेकरून ते सहजपणे योग्य उत्तरापर्यंत पोहोचतील.